ETV Bharat / state

धारावी डायरी : कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होतोय का? - मुंबई कोरोना अपडेट

धारावीत अडीच हजार आरोग्यसेवक आणि सेविका तसेच २७ खासगी डॉक्टर, २९ परिचारिका, ६८ वॉर्डबॉय, ११ सहाय्यक आणि दोन फार्मासिस्ट काम करत आहेत. धारावीत आतापर्यंत ४७ हजार ५०० जणांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे. २५ खासगी रुग्णालयांतर्फे एक लाख ७५ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.

धारावी डायरी : कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होतोय का?

author img

By

Published : May 30, 2020, 5:17 PM IST

मुंबई - कोरोनाने धारावी परिसराला मेटाकुटीस आणले होते. मात्र, सध्या हळूहळू परिस्थिती बदलत आहे. मिशन धारावी आणि नॉर्मल क्लिनिकच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात लोकांची तपासणी करत उपाययोजना होत आहेत. धारावीतून मोठ्या प्रमाणात कामगार व चाकरमानी गावी स्थलांतरित झाल्याने चांगले परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हापासून दिवसात रोज शंभराहून अधिक रुग्ण धारावीत सापडायचे. पण आता रुग्ण पहिल्या प्रमाणापेक्षा या परिसरात कमी आढळत आहेत. त्यामुळे धारावीत कोरोनाचा विळखा हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे आहेत.

मुंबईतील इतर विभागांमध्ये रोजच्या रुग्णवाढीचा दर ४ ते ९ टक्क्यांवर आहे. मात्र, धारावीत प्रतिदिन सर्वात कमी म्हणजे २.६ टक्के रुग्ण वाढत आहेत. धारावीत मृतांचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे एकूण रुग्णांच्या चार टक्के इतके झाले आहे. धारावीत गेल्या पाच दिवसांपासून एकही मृत्यू झालेला नाही. आता धारावीत 1715 एकूण रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला आहे.

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार राहतात. झोपडपट्टीत लोकांची लोकसंख्या म्हणाल तर दहा लाखांपेक्षा अधिक असे सांगितले जाते. लाखापेक्षा अधिक झोपडपट्ट्या याठिकाणी आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हापासून राज्यात आला तेव्हापासून धारावीत कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फिजिकल डिस्टन्स नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे त्या करणेही शक्य नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढतच होता. परंतु पालिकेच्या फेवर क्लिनिक आणि निजर्तुंकीकरण फवारणीमुळे तसेच या ठिकाणी कामगार आणि चाकरमानी चार लाखांपेक्षा अधिक आपल्या गावी गेले, त्यामुळे वस्त्यांमध्ये गर्दी नसल्याने योग्य उपाययोजना पालिकेला व प्रशासनाला करता येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता प्रादुर्भाव कमी आहे.

सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना वाढत होता. त्यामुळे कोरोना काळात धारावीतील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि सॅनिटायजेशन करण्यासाठी मुंबई महापालिकेने काम सुरू केले होते. केंद्रीय तपासणी पथकाने धारावी येथे पाहणी केल्यानंतर सफाईबाबत काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नियुक्त केलेल्या एका अशासकीय संस्थेकडून पुन्हा दिवसातून दोन वेळा सॅनिटाईज करण्यात येत आहे. १४०० सार्वजनिक शौचालयांच्या सॅनिटायझेशनची कामे नियमितपणे सकाळ आणि रात्रपाळी या पद्धतीने दररोज किमान चार ते पाचवेळा करण्यात येत आहेत. आर्सेनिक गोळ्या, मास्क, सॅनिटायझर आम्ही लोकांपर्यंत काळजी घेण्यासाठी पोहचवत आहोत. तसेच वॉर्डातील कोणालाही काही समस्या असल्यास लगेच निवारण होत आहे. त्यामुळे सध्या रुग्ण कमी होत आहेत. धारावीत कोरोना संक्रमण थांबवू, असे वॉर्ड ऑफिसर किरन दिघावकर यांनी सांगितले.

दरम्यान, धारावीत अडीच हजार आरोग्यसेवक आणि सेविका तसेच २७ खासगी डॉक्टर, २९ परिचारिका, ६८ वॉर्डबॉय, ११ सहाय्यक आणि दोन फार्मासिस्ट काम करत आहेत. धारावीत आतापर्यंत ४७ हजार ५०० जणांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे. २५ खासगी रुग्णालयांतर्फे एक लाख ७५ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच धारावीत आतपर्यंत सर्व मिळून चार हजारांहून अधिक बेडच्या क्वारंटाईन सेंटरची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. पावसाळ्यात रुग्ण वाढू नये म्हणून धारावीतील ठिकठिकाणी नालेसफाई, प्रत्येक विभागात फेवर क्लीनिक उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्या तरी धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत चाललेला आहे. तो पुढे कमी झालेला पाहायला मिळेल अशी व्यवस्था आम्ही उभारली असल्याचे मत स्थानिक आमदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.