ETV Bharat / state

ईटीव्ही एक्सक्लुजीव : कोरोना लस देशभर पोहोचवण्यासाठी 'कुल एक्स कोल्ड चैन' सज्ज

गेल्या मार्च महिन्यापासून आपला देश कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. कारण येत्या 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांंना लस दिली जाईल. लसीकरणासाठी लस वितरण कंपन्यांनी कंबर कसली आहे.

Corona Vaccination
कोरोना लसीकरण
author img

By

Published : Jan 11, 2021, 1:35 PM IST

मुंबई - कोरोना लढ्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्याला आता देशात सुरुवात होत आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असून कोरोनामुक्तीच्या दिशेने टाकलेल हे पहिले पाऊल असणार आहे. अशावेळी हे पहिले पाऊल टाकण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, सिरम इन्स्टिट्यूट आणि लसीचे प्रत्यक्ष वितरण देशातील प्रत्येक डेपो (कोल्ड स्टोरेज डेपो)पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणारी 'कुल एक्स कोल्ड चैन' कंपनीही सज्ज झाली आहे. त्यानुसार कोणत्याही क्षणी सिरमकडून आदेश आल्याबरोबर मुंबई, गुजरातसह अन्य राज्यात लसीचे वितरण करण्यासाठी आम्ही पूर्णतः तयार आहोत, अशी माहिती 'कुल एक्स कोल्ड चैन' कंपनीचे सहसंस्थापक राहुल अगरवाल यांनी खास 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

'देशभरात लसीचे वितरण करण्यासाठी आम्ही 300 कोल्ड ट्रक सज्ज ठेवल्या आहेत. रस्ते मार्गे आणि विमानाने लस पोहचवली जाणार असून त्या-त्या डेपोपर्यंत आम्ही ट्रकद्वारे लस पोहचवणार आहोत', असेही अगरवाल यांनी सांगितले.

तीन कंपन्यांवर लस वितरणाची जबाबदारी -

देशात एकाच वेळी मोठ्या संख्येने लसीकरण मोहीम राबवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे लसीचे वितरण आणि लसीची साठवणूक योग्य प्रकारे करण्याचे आव्हान सिरम समोर आहे. हे आव्हान पेलत सिरमने तीन कंपन्यांवर लस वितरणाची जबाबदारी टाकली आहे. यात सर्वात आघाडीवर कुल एक्स कोल्ड चैन ही मुंबईस्थित कंपनी आहे. हीच कंपनी मुंबईला लस पोहोचवणार आहे. तर, देशातील अनेक राज्यातील डेपोपर्यंत लस पोहोचण्याची जबाबदारीही या कंपनीवर आहे. या कंपनीबरोबर इतर दोन कंपन्याही या प्रक्रियेत असणार आहेत, असेही अगरवाल यांनी सांगितले.

मुंबई आणि गुजरातला रस्ते मार्गे लस पोहचवली जाणार -

16 जानेवारीला देशभरात कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे आता खूपच कमी वेळ उरला असून कोणत्याही क्षणी अगरवाल यांच्या कंपनीसह इतर कंपन्यांना लस उपलब्ध होईल. त्या विविध डेपोपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार देशभरासाठी 300 ट्रक सज्ज ठेवण्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई ते पुणे अंतर कमी, केवळ चार तासाचे आहे. त्यामुळे मुंबईला कोल्ड ट्रकने लस पोहोचवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी गुजरातच्या सीमेपर्यंत लस पोहचवायची असून हे अंतरही कमी आहे. त्यामुळे गुजरातला देखील रस्ते मार्गे कोल्ड ट्रकनेच लस पोहोचवली जाणार आहे.

गरज पडल्यास ट्रकची संख्या वाढवणार -

देशभरात लस पोहचवणे मोठे आव्हान वितरण कंपन्यासाठी असणार आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूटवरून विमानतळ आणि पुढे त्या-त्या राज्यातील संबंधित विमानतळावरून कोल्ड स्टोरेज डेपोपर्यंत लस पोहचवण्याची जबाबदारी या कंपन्याना पार पाडावी लागणार आहे. यासाठी 300 कोल्ड ट्रक अगरवाल यांनी सज्ज ठेवले आहेत. मात्र, गरज लागल्यास आणखी 200 ट्रक उपलब्ध करून देण्याची तयारी या कंपनीची आहे. एकूणच आता कोणत्याही क्षणी लसीच्या वितरणाला सुरुवात होणार आहे हे निश्चित झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.