ETV Bharat / state

'हिंदुहृदयसम्राट' एकच! एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरून संतप्त प्रतिक्रिया; पाहा स्पेशल रिपोर्ट - एकनाथ शिंदे

राजस्थानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'हिंदुहृदयसम्राट' असा केल्यानं यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. "एकनाथ शिंदे स्वतःला हिंदुहृदयसम्राट का म्हणून घेतात हे त्यांनी स्पष्ट करावं", असं संजय राऊत म्हणाले.

hindu hruday samrat
hindu hruday samrat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 9:30 PM IST

पाहा व्हिडिओ

मुंबई : शिवसेना शिंदे गटानं राजस्थान विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा केलाय. त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: राजस्थानात गेले होते. दरम्यान, तेथे एका भाजपाच्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'हिंदुहृदयसम्राट' असा करण्यात आला. त्यावरून आता राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

राजकीय वातावरण तापलं : सामान्यत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 'हिंदुहृदयसम्राट' म्हणून संबोधलं जातं. त्यांच्या या बिरूदावलीला कोणाचाही आक्षेप नाही. याशिवाय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही या नावानं संबोधलं गेलं आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता, जयपुरच्या हवामहल मतदार संघातील भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य यांच्या प्रचारादरम्यान पोस्टर आणि जाहिरातींमध्ये त्यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा करण्यात आला. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापलंय.

संजय राऊत यांची टीका : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. "एकनाथ शिंदे गट लवकरच भाजपामध्ये विलीन होईल", असं ते म्हणाले. "एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबाहेर हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लावून घेतली. त्यांची हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात अशी उपाधी लावून दाखवावी. या आधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ही उपाधी दिली गेली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोणीही हिंदुहृदयसम्राट नाही. एकनाथ शिंदे स्वतःला हिंदुहृदयसम्राट का म्हणून घेतात हे त्यांनी स्पष्ट करावं", असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.

विरोधकांचा खोडसाळपणा आहे का : या संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "या देशात हिंदुहृदयसम्राट केवळ बाळासाहेब ठाकरेच आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ही उपाधी लावण्याचा खोडसाळपणा विरोधकांनी तर केला नाही ना? हे सुद्धा पाहिलं पाहिजे. एकनाथ शिंदे कधीही स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणून घेत नाहीत. ते स्वतःला केवळ शिवसेनेचे नेते मानतात. मात्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या नावापुढे सोनिया हृदयसम्राट किंवा शरद हृदयसम्राट लावायला हरकत नाही", असा टोला वाघमारे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी चूक दुरुस्त करावी : या प्रकरणावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनीही आपलं मत मांडलं. "संपूर्ण देशाला माहित आहे की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. राजस्थानमधील काही उत्साही कार्यकर्त्यांनी जर त्यांना अशा पद्धतीनं उपाधी लावली असेल, तर ती स्वतः शिंदे यांनाही आवडणार नाही. एकनाथ शिंदे हे आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत, असं सांगतात. त्यामुळे त्यांची उपाधी आपल्या नावापुढे लावण्याची चूक त्यांना दुरुस्त करावी लागेल. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटतील, असं जोशी म्हणाले.

मतं मिळवण्यासाठीचा प्रयत्न : या संदर्भात राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांचं मत मात्र वेगळं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदुत्ववादी अशी विशेष ओळख असलेला नेता सध्या नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि महाराष्ट्राबाहेर आपल्या पक्षाची पाळमुळं रोवण्यासाठी हिंदुत्वाचा आधार घेणं किंवा तशी उपाधी नावापुढे लावून मतं मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न असू शकतो. महाराष्ट्रात ही बाब निश्चितच खटकणारी आणि जनतेला न पटणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर हा प्रयोग केला तर तो किती पचनी पडतो, हे चाचपण्याचा हा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता गायकवाड यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट लावलं तर लोक जोड्यानं मारतील; 'त्या' बॅनरवरुन संजय राऊतांचं शिंदेंवर टिकास्त्र
  2. एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण' प्रथमच राज्याबाहेर निवडणूक लढवणार, कोण आहे निशाण्यावर?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.