ETV Bharat / state

Sanjay Rathod in Shinde Cabinet - वादग्रस्त आमदार संजय राठोड व अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश - शिंदे मंत्रिमंडळ विस्तार

रखडलेला शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ ( Sanjay Rathod inducted in Shinde Cabinet ) विस्तार अखेर काल पार पडला. या विस्तारात शिंदे गट ( cm eknath shinde cabinet ) आणि भाजप यांच्या प्रत्येकी ९ अशा एकूण १८ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोपनीयतेची ( abdul sattar inducted in cm eknath shinde cabinet ) शपथ दिली. परंतु, या १८ मंत्र्यांमध्ये शिंदे गटाकडून शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांपैकी संजय राठोड व अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आल्याने ( cm eknath shinde cabinet expansion ) वादाची ठिणगी पडली आहे.

controversial mla sanjay rathod and abdul sattar
आमदार संजय राठोड शिंदे मंत्रिमंडळात समावेश
author img

By

Published : Aug 10, 2022, 10:36 AM IST

मुंबई - रखडलेला शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ( Sanjay Rathod inducted in Shinde Cabinet ) अखेर काल पार पडला. या विस्तारात शिंदे गट ( cm eknath shinde cabinet ) आणि भाजप यांच्या प्रत्येकी ९ अशा एकूण १८ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( abdul sattar inducted in cm eknath shinde cabinet ) यांनी गोपनीयतेची शपथ दिली. परंतु, या १८ मंत्र्यांमध्ये शिंदे गटाकडून शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांपैकी संजय राठोड व अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली आहे. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ( cm eknath shinde cabinet expansion ) विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर सरकारवर जोरदार टीका होणार असून हे शिंदे यांना माहीत असून सुद्धा असे का केले, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

हेही वाचा - Covid-19 In India : कोरोनाचा आलेख घसरला, देशात 16 हजार 047 नवीन कोरोनाबाधित, 54 रुग्णांचा मृत्यू

राठोड, सत्तार यांना क्लीन चिट? - काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सर्वात अगोदर भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली. पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील समावेश ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत, राठोड मंत्री झाले तरी माझा लढा मी सुरूच ठेवणार, असे चित्रा वाघ म्हणाल्या. यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपर जर कोणाचे काही मत असेल तर ते ऐकून घेण्यात येईल. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांना टीईटी घोटाळ्यात शिक्षण विभागाने क्लीन चीट दिल्याने त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राठोड यांच्यावर काय आहे आरोप? - पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येप्रकरणी राठोड यांच्यावर आरोप झाले होते. युवतीने आत्महत्येपूर्वी राठोड यांच्या निकटवर्तीयांबरोबर केलेल्या संभाषणात सातत्याने संजय राठोड यांचा उल्लेख केला होता. या युवतीची ध्वनिफीती समाज माध्यमांमध्ये प्रसारित होताच त्यावरून गदारोळ झाला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. सरकारच्या प्रतिमेवर होणारा परिणाम आणि भाजपकडून सातत्याने केला जाणाऱ्या आरोपांमुळे राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पुढे तरुणीच्या कुटुंबीयांनी राठोड यांच्या बाबत पोलिसांना दिलेल्या जबाबदातून राठोड आत्महत्येस जबाबदार नसल्याचे कारण देत पोलिसांनी राठोड यांना निर्दोषेत्व बहाल केले. मात्र सरकारच्या दबावामुळे पोलिसांनी राठोड यांच्याविरुद्ध कारवाई केली नसल्याचे आणि कुटुंबीयांनी अयोग्य जबाब दिला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तेव्हापासून एकनाथ शिंदे राठोड यांच्या पाठीशी - महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या प्रकरणावरून आरोप होताच तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांच्या दबावाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आग्रह धरल्याने त्यांची चांगली अडचण झाली होती. अशावेळी एकनाथ शिंदे हे मात्र संजय राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते व त्यांचा राजीनामा घेऊ नये असे ते सांगत होते. तरीसुद्धा वाढत्या दबावाच्या कारणाने उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. परंतु, आता आपल्या मंत्रिमंडळात राठोड यांना संधी देत आमदार व मंत्र्यांना कसे सांभाळायचे हे त्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवून दिल्याबरोबरच दिलेला शब्द खरा करून दाखवण्याचे व आमदारांची मन जिंकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.

राठोड यांना का केले मंत्री? - विदर्भातील संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याकारणाने भाजपचे पाच आमदार असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी युती सरकारमध्ये २०१४ ते २०१९ मध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये २०१९ ते २०२१ असे दीड वर्ष वनमंत्री म्हणून ते कार्यरत होते. लोकांमधील नेता अशी संजय राठोड यांची मतदारसंघात ओळख आहे.

२००४ पासून ते सलग आमदार आहेत. बंजारा बहुल इलाका असलेल्या दिग्रस मतदारसंघात आमदार झाल्यानंतर या मतदारसंघावर त्यांची एकछत्री पकड आहे. बंजारा समाजाची ताकद, लोकांमध्ये थेट जाण्याची वृत्ती, मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीचे काम करून देण्याची धडपड, यामुळे संजय राठोड मतदारसंघात लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. संजय राठोड यांची विदर्भात शिंदे गटाची ताकद वाढवण्यात मदत होऊ शकते. या सर्व कारणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ टाकली आहे.

अब्दुल सत्तार यांच्यावर मुख्यमंत्र्यांची मेहरबानी? - दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या एक दिवस आधीच ज्यांचे नाव गाजले ते अब्दुल सत्तार यांना सुद्धा मंत्रिमंडळात प्रवेश देण्यात आला आहे. विशेष करून शिक्षक पात्रता परीक्षेतील टीईटी घोटाळ्यामधील अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांच्या तीन अपत्यांची नावे समोर आल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नाही, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. परंतु, मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या रात्री तीन वाजता शिक्षण विभागाने क्लीन चीट दिल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणून दिले. त्यामुळे, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी सत्तार यांना क्लीन चीट दिली असल्याने त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला. अब्दुल सत्तार यांना ते ज्या पक्षात असतात त्या पक्षातील सर्वोच्च पदावरील नेत्यांची स्तुती करणे, ते मतदारसंघात आले की त्यांच्यावर फुलांची उधळण करणे व गर्दी जमवणे व त्यातून लाभ कसा भेटेल हे त्यांना चांगलेच समजते. एखादे प्रकरण विरोधात जाईल असे लक्षात आले की माध्यमांमध्ये हसून त्यांचे महत्व कसे घालून टाकायचे या वृत्तीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरणाऱ्या अब्दुल सत्तार यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले. राम राम, सलाम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र असे एका दमात म्हणणारे सत्तार यांचा सिल्लोड मतदारसंघ मात्र बांधलेला आहे. सिल्लोड नगर परिषदेचे अध्यक्ष, औरंगाबाद जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक या पदावर सत्ता राहिली आहे. औरंगाबादमध्ये विशेष करून मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अब्दुल सत्तार यांचा मोठा फायदा शिंदे गटाला होणार आहे.

हेही वाचा - Eknath shinde cabinet minister portfolios - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगर विकास, सामान्य प्रशासन तर फडणवीसांना गृह व वित्त खातं?

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.