ETV Bharat / state

भाजपा खासदारांच्या यादीत रक्षा खडसे यांचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्रालयाने दिला कारवाईचा इशारा - भाजपा खासदार रक्षा खडसे लेटेस्ट न्यूज

रक्षा खडसे यांच्याबद्दल भाजपाच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा स्क्रीनशॉट जोडत पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केले आहे. त्यानंतर गोंधळ उडाला असून याबाबत राज्याच्या गृहमंत्रालयाने भाजपावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Raksha Khadse
रक्षा खडसे
author img

By

Published : Jan 28, 2021, 10:03 AM IST

Updated : Jan 28, 2021, 10:40 AM IST

मुंबई - रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची पक्षाच्या वेबसाईटवरच चुकीची ओळख असल्याचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून कारवाईचा इशारा दिला आहे.अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने हे कृत्य करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल करावाई करेल, असेही देशमुख म्हटले आहेत.

काय आहे प्रकरण -

खासदार व एकनाथ खडसे यांची सून असणाऱ्या रक्षा खडसे यांच्याबद्दल भाजपाच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा स्क्रीनशॉट जोडत पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केले आहे. भाजपाची अधिकृत वेबसाइट कोण चालवतं? त्यात महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासोबतच समलैंगी समुदायाचाही अवमान करण्यात आला आहे, असे चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही या ट्वीटमध्ये टॅग केले आहे. प्रत्यक्षात याबाबत खातरजमा केली असता हा भाषांतराचा गोंधळ असल्याचे दिसत आहे.

Last Updated : Jan 28, 2021, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.