मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणीसाठी 'चेक इन मास्टर' नावाचे अॅप लाँच केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर याच अॅपच्या माध्यमातून तिकीट तपासणी केली जात आहे. 'चेक इन मास्टर'च्या मदतीने सुरक्षित अंतरावरून आरक्षित (पीआरएस) आणि अनारक्षित (यूटीएस) तिकिटे तपासली जातात. प्रवाशांच्या थर्मल स्क्रिनिंगसाठी हॅन्डहेल्ड थर्मल गनदेखील तपासणी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षेच्या पुढील टप्प्यात स्वयंचलित क्यूआर-कोड आधारित तिकीट तपासणीसह प्रवेश आणि बाहेर पडताना फ्लॅप-बेस आधारित गेट बसवण्याचे नियोजन केले जात आहे. हे 'चेक इन मास्टर' अॅप तिकीट तपासणी कर्मचार्यांच्या उपस्थिती आणि रिअल टाइम देखरेखीसाठी देखील वापरले जाऊ शकते. रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (आरईसीएल) च्या सीएसआर फंडा अंतर्गत या अॅपची निर्मिती केली गेले आहे. यासाठी रेल्वेला काहीही खर्च आलेला नाही.
अलीकडेच मध्ये रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणी कर्मचार्यांना नेकबॅन्ड पोर्टेबल पब्लिक अॅड्रेस सिस्टम उपलब्ध करून दिले आहे. त्याच्या मदतीने सोशल डिस्टंन्सिंग राखून प्रवाशांशी संवाद साधता येतो. ट्रेनमध्ये बसण्यासाठी येताना प्रवाशांना स्टेशनवर मार्गदर्शन करण्यासाठी व मदत करण्यासाठी हे उपयुक्त आहे.