ETV Bharat / state

Construction world record : बांधकाम क्षेत्रात विक्रम; फक्त 43 दिवसात पूर्ण केले अशक्य बांधकाम

नाशिकच्या युवा सिव्हील इंजिनीयर ( Young Civil Engineer ) मयुर जैन यांनी एका कंपनीचे 8 हजार 415 स्क्वेअर फुटचे बबांधकाम करण्यासाठी 105 दिवसांचा कालावधी लागणारे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ( Use of advanced technology ) करत अवघ्या 43 दिवसात पूर्ण केले आहे. याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यामध्ये करण्यात आली आहे. (Construction world record in india )

Construction world record
बांधकाम क्षेत्रात विक्रम
author img

By

Published : Jan 11, 2023, 3:00 PM IST

Updated : Jan 11, 2023, 10:09 PM IST

बांधकाम क्षेत्रात विक्रम

नाशिक: नाशिक शहर मेट्रो सिटीकडे वाटचाल करत असतांना नाशिकचा विकास झपाट्याने होत आहे. यामुळे युवा तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अशातच नाशिकचे युवागल कहं इंजिनिअर असलेले मयुर जैन यांनी कौतुकास्पद काम करत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जैन यांनी एका कंपनीचे 8 हजार 415 स्क्वेअर फुटचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केसा 105 दिवसाच्या कालावधी लागणारे काम अवघ्या 43 दिवसात पूर्ण केले. यात पायाभरणी, प्लीथ फिलिंग, प्लीथ कास्टिंग, टाय बीम, पीसीसी, रेनफॉर्समेंट, पीटी स्लॅब कास्टिंग पर्यंतचे पूर्ण काम करण्यात आले आहे. हे सर्व काम सर्व स्टॅंडर्ड मेंटेन करून करण्यात आला आहे. यामध्ये काँक्रीट स्ट्रेंथ सेन्सर ( Concrete Strength Sensor ) लावण्यात आले आहे. (Use of advanced technology)

रियल टाइमिंगमध्ये काँक्रीटची खरी कळते ताकद : मोबाईलवर ॲप द्वारे रियल टाइमिंगमध्ये काँक्रीटची खरी ताकद कळते, या कामाला व्यवस्थित व लवकर पूर्ण व्हावे यासाठी विशेष सेंटरिंग डिझाईन करण्यात आली आहे, बांधकामाला लवकर ताकद मिळावी यासाठी विशेष केमिकलचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच या कामासाठी 50 कामगार दिवस रात्र झटत होते. विशेष म्हणजे 43 दिवस संपल्यानंतर स्लॅब उघडण्याचे काम फक्त 7 दिवसाच्या आत करण्यात आले. साधारणपणे याला 25 दिवस लागतात. ( construction world record )

या आधी अनेक विक्रम : विश्व प्रसिद्ध मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथे सात मजली 100 रूमची धर्मशाळा, सर्वतोभ्रद महल, संत निवास आदी कामे विक्रमी वेळात पूर्ण केले आहेत. काही महिन्यापूर्वीच मांगीतुंगी येथे झालेल्या महामस्तक अभिषेक सोहळ्यात फक्त 10 दिवसात 1800 स्क्वेअर फुटचे बांधकाम सहित 12 फूट उंच भगवंताची वेदी तयार करण्यात आली होती. ज्यावर 40 टनाची भगवंतांची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. त्यांच्या या कार्याला बघून 2022 चा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर नाशिक चॅप्टरचा प्रॉमिसिंग इंजिनियर अवॉर्डने त्यांना गौरवण्यात आले आहे. (Construction world record in india )

संघर्षमय जीवन : युवा इंजिनिअर मयुर जैन यांचे वडील मुकेश जैन हे एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करत होते,अशा बिकट परिस्थितीत मयुर जैन यांनी आपले शैक्षणिक जीवन पूर्ण केला. वडिलांना कामात मदत करत त्यांनी सिव्हिल इंजिनिअर तसेच चार्टर्ड इंजिनीयरचा शिक्षण पूर्ण केले.

Last Updated : Jan 11, 2023, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.