मुंबई : देशात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा (Independence Day is celebrated with enthusiasm) केला जात आहे, पण काळा दिवस पाळणाऱ्या काही लोकांची विचारधारा बघा. स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान न देता ते लोकसभेत बसले आहेत. खोटे बोलून सत्तेत आलेले गेली नऊ वर्षे देशाची संपत्ती विकून देश चालवत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते.
संविधानाचा रोज खून : बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मुख्य प्रवाहात आणले. संविधानाचा रोज खून केला जात असून भय, भ्रष्टाचारातून सत्ता स्थापन करण्याचे काम सुरु असल्याचे देखील पटोले यांनी म्हटले आहे. ब्रिटिश काळात जी भाषा वापरली जायची तीच भाषा या सरकारकडून वापरली जात आहे. ब्रिटिशांना देशाबाहेर हाकलून देण्यासाठी काँग्रेसचे ज्या प्रकारे मोठे योगदान होते. त्याच प्रमाणे देशात पुन्हा आंदोलन करावे लागणार आहे.
मोदी असंवेदनशील पंतप्रधान : देशात इंग्रजासारखीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जनतेने आता सजक, जागृत राहणे गरजेचे आहे. मणिपूर प्रकरणावर देशाचे पंतप्रधान एक शब्द देखील बोलत नाही. असंवेदनशील पंतप्रधान देशाने प्रथमच पाहिले आहेत. आपल्या देशाला पुन्हा पारतंत्र्यात लोटण्याचे काम भाजपा करीत असल्याचा आरोप देखील पटोले यांनी केला आहे.
लाल किल्ल्यावरून खोटे बोलू नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी पुन्हा लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणार, असे म्हणणारे अहंकारी आहेत. आपल्या देशात नेत्यांपेक्षा जनता मोठी असते. निवडणुकीत कोणाला निवडून आणायचे कोणाला पराभूत करायचे हा जनतेचा अधिकार आहे. जनतेने दिग्गज नेत्यांचा पराभव केला आहे. अशा प्रकराची अहंकारी भाषा पंतप्रधानांनी वापरु नये असा टोला पटोलेंनी मोदींना लगावला आहे.
काँग्रेसला शिव्याशाप : गेली 9 वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसला शिव्याशाप देण्याशिवाय भाजपाने दुसरे काय काम केले, असा सवाल पटोले यांनी केला आहे. आता काँग्रेसचा अपमान करून मोदी आपले अपयश लपवू शकणार नाहीत, अशी टीका त्यांनी मोदींवर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे मित्र आहेत, त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काळजी घ्यावी, असा चिमटा नाना पटोले यांनी एकनाथ शिंदेंना काढला आहे.
हेही वाचा -
- Praful Patel Met Nawab Malik : नवाब मालिक कोणासोबत? भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांनी सांगितले...
- Supriya Sule : पंतप्रधान मोदींच्या 'त्या' टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, घराणेशाही...
- Devendra Fadnavis : भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महाराष्ट्र मोठे योगदान देईल - देवेंद्र फडणवीस