ETV Bharat / state

'भाजपच्या दडपशाहीला काँग्रेस घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारतच राहू' - बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका

भाजपाच्या या दहशतीला, दडपशाहीला काँग्रेस जुमानत नसून राष्ट्रहितासाठी, जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेसचे नेते यापुढेही संघर्ष करतच राहतील. विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नात त्यांना कदापी यश येणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

congress state president balasaheb thorat  balasaheb thorat criticized BJP  बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका  बाळासाहेब थोरात न्यूज
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Jul 8, 2020, 4:52 PM IST

Updated : Jul 8, 2020, 5:30 PM IST

मुंबई - काँग्रेसी विचारांच्या काही संस्थांची ईडीकडून चौकशी होणार, अशा बातम्या काही प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत. भाजपा व त्यांचे केंद्रातील सरकार यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार? चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले. त्यामुळे ईडीचा वापर करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

'भाजपच्या दडपशाहीला काँग्रेस घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारतच राहू'

राहुल गांधी यांनी चीनची घुसखोरी व २० जवानांच्या बलिदानावर पंतप्रधान मोदी तसेच केंद्र सरकारला सातत्याने जाब विचारण्याचे काम केले. इंधन दरवाढीवरुनही सरकारला प्रश्न केले. तसेच कोरोनाचे संकट आल्याबरोबर हे अतिशय गंभीर असून सरकारने त्यावर तातडीने पावले उचलली पाहिजे, असा सल्ला राहुल गांधी यांनी सरकारला दिला होता. परंतु, या सरकारला विरोधकांनी प्रश्न विचारले ते चालत नाहीत. लोकशाहीवर यांचा विश्वासच नाही. फक्त विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी दडपशाहीचा, दहशतीचा मार्ग अवलंबणे हीच भाजपा सरकारची निती राहिली आहे, असा आरोपही थोरातांनी केला. भाजपाच्या या दहशतीला, दडपशाहीला काँग्रेस जुमानत नसून राष्ट्रहितासाठी, जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेसचे नेते यापुढेही संघर्ष करतच राहतील. विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नात त्यांना कदापी यश येणार नाही, असेही थोरात म्हणाले.

राजगृहाची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची समाजकंटकांनी केलेली तोडफोड अत्यंत निषेधार्ह आहे. राजगृह हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. आमच्यासारख्या आंबेडकर अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर शासन करावे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. राजगृह हे लोकशाही, संविधानावर श्रद्धा असणाऱ्यांचे प्रेरणास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती या वास्तूशी जोडल्या गेल्या आहेत, असेही थोरात म्हणाले.

Last Updated : Jul 8, 2020, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.