मुंबई - महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटाशी लढत असताना सत्तेसाठी हपापलेला भाजप महाराष्ट्राचे राजकीय रणांगण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न राज्यातील सूज्ञ जनतेने हाणून पाडला. महाविकास आघाडीतर्फे सुरू करण्यात आलेल्या #महाराष्ट्रद्रोहीBJP या ट्वीटर ट्रेंडला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा उघडा पडला आहे. इज्जत वाचविण्यासाठी शेवटी भाजपवर उत्तर प्रदेश, बिहारच्या ट्रोल्स आणि बॉट्सची मदत घेण्याची नामुष्की ओढावली, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
'संकटकाळात गलिच्छ राजकारण करण्याचा भाजपचा डाव जनतेने हाणून पाडला'
सरकार वैज्ञानिक दृष्टीकोनातून कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे हे भाजप नेत्यांच्या पचनी पडत नसावे. टाळ्या, थाळ्या वाजवून, दिवे लावून किंवा दोरीच्या उड्या आणि बेडूक उड्या मारून कोरोना पळून गेला असता, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा असावी, असा टोला सावंत यांनी लगावला.