ETV Bharat / state

सोनिया गांधींचा शिवसेनेला पाठिंबा देण्याबात आमदारांशी संवाद - सोनिया गांधींचा आमदारांशी संवाद

भाजपकडून काँग्रेसचे आमदार फोडले जातील या भीतीपोटी काँग्रेसने आपल्या आमदारांना गेल्या ४ दिवसांपासून जयपूर येथे ठेवले होते. मात्र, आज राज्यातील एकूण घडामोडी लक्षात घेऊन त्यांना मुंबईत बोलावले. आज त्यांच्याशी थेट सोनिया गांधी यांनी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. त्यात बहुतेक आमदाराने शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावे, असे मत व्यक्त केले असल्याची माहिती देण्यात आली.

सोनिया गांधी
author img

By

Published : Nov 11, 2019, 6:42 PM IST

मुंबई - राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातील आमदारांशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधला. यामध्ये त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी दोन्ही बाजूने काय मत आहे? हे जाणून घेतले असल्याची माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय मार्गी लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. यासाठी लवकरच सोनिया गांधींकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. आज दिल्ली येथे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत देखील शिवसेनेला पाठिंबा देणे विषयीचे एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काही वेळापूर्वी राज्यातील आमदारांचे दूरध्वनीवरून याविषयीचे मत जाणून घेतले. त्यात बहुतेक आमदारांनी राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यापासून ते थेट सत्तेत सहभागी होण्यापर्यंतची आपली मते व्यक्त केली असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

भाजपकडून काँग्रेसचे आमदार फोडले जातील या भीतीपोटी काँग्रेसने आपल्या आमदारांना गेल्या ४ दिवसांपासून जयपूर येथे ठेवले होते. मात्र, आज राज्यातील एकूण घडामोडी लक्षात घेऊन त्यांना मुंबईत बोलावले. आज त्यांच्याशी थेट सोनिया गांधी यांनी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. त्यात बहुतेक आमदाराने शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावे, असे मत व्यक्त केले असल्याची माहिती देण्यात आली.

काँग्रेस आमदार जयपूरला रवाना होण्यापूर्वी मुंबईत काही तरुण आमदारांची बैठक झाली होती. त्या बैठकीत देखील सर्व तरुण आमदारांनी आपल्या सर्वांचे एक पत्र तयार करून ते सोनिया गांधी यांना पाठवले होते. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये निर्णय घेतला जात नव्हता. मात्र, आज एकूणच राज्यातील पेच प्रसंग लक्षात घेता काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार की नाही? याबाबतचा निर्णय थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

Intro:पाठिंबा देण्यासाठी सोनिया गांधींनी सातला आमदारांशी संवाद

mh-mum-01-cong-mla-7201153

मुंबई, ता.
राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातील आमदारांशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधला. यात त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी दोन्ही बाजूने काय मत आहे हे जाणून घेतले असल्याची माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय मार्गी लागण्याची चिन्ह निर्माण झाले असून यासाठी लवकरच सोनिया गांधी कडून ग्रीन सिग्नल मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दिल्ली येथे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत ही शिवसेनेला पाठिंबा देणे विषयीचे एकमत झाले असून त्यानंतर सोनिया गांधी यांनी राज्यातील आमदारांना काही वेळापूर्वी दूरध्वनी करून याविषयीचे मत जाणून घेतले. त्यात बहुतेक आमदारांनी राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यापासून ते थेट सत्तेत सहभागी होण्यापर्यंतचा आपली मते व्यक्त केली असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
भाजपाकडून काँग्रेसचे आमदार फोडले जातील या भीतीपोटी काँग्रेसने आपल्या आमदारांना मागील चार दिवसांपासून जयपूर येथे ठेवले होते. मात्र आज राज्यातील एकूण घडामोडी लक्षात घेऊन त्यांना मुंबईत बोलावले असून आज त्यांच्याशी थेट सोनिया गांधी यांनी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.त्यात बहुतेक आमदाराने शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावे असे मत व्यक्त केले असल्याची माहिती देण्यात आली.
काँग्रेस आमदार जयपूरला रवाना होण्यापूर्वी मुंबईत काही तरुण आमदारांची बैठक झाली होती. त्या बैठकीत ही सर्व तरुण आमदारांनी आपल्या सर्वांचे एक पत्र तयार करून ते सोनिया गांधी यांना पाठवले होते मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये निर्णय घेतला जात नव्हता मात्र आज एकूणच राज्यातील पेच प्रसंग लक्षात घेता काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देणे विषयीचा निर्णय थोड्याच वेळात जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Body:पाठिंबा देण्यासाठी सोनिया गांधींनी सातला आमदारांशी संवादConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.