मुंबई: एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील अनेक बडे नेते त्यांच्या बचावासाठी समोर आले आहेत. मात्र समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरात संघाचे मुख्यालय असलेल्या कार्यालयात जाऊन त्यांनी डॉक्टर मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच समीर वानखेडे यांच्या मागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. या दोन गोष्टींचा काही परस्पर संबंध आहे का? हे तपासणी गरजेचे असल्याचे पटोले म्हणाले.
पोलखोल होण्याची संघ आणि भाजपाला भीती आहे का? : दरम्यान यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, समीर वानखेडे यांनी मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होण्यामागे नेमक काय कारण दडले आहे, ते समोर यायला पाहिजे. या प्रकरणात काहीतरी निश्चितच लपलेला आहे असे वाटते. तसेच समीर वानखेडे यांच्याकडे अशी काहीतरी माहिती असावी ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची पोलखोल होऊ शकते. तर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू होताच, महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक बडे नेते अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा वानखेडे यांच्या केसाला धक्का लागला तर बघून घेऊ, अशी भाषा करत आहेत. सीबीआय आणि इंडिया तपास यंत्रणा जर केंद्र सरकारच्याच आहेत, मग वानखेडे यांच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा का त्रास होतो आहे. असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
समीर वानखेडे यांनी मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होण्यामागे नेमक काय कारण दडले आहे, ते समोर यायला पाहिजे. - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
मेरिटनुसारच जागा वाटपाचा निर्णय?: महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या संदर्भात विचारले असता पटोले म्हणाले की, आघाडीतील जागावाटप हे मेरिट नुसारच होईल. प्रत्येक पक्षाने या संदर्भामध्ये चाचपणी करावी यात काहीही गैर नाही. मात्र जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटनुसारच होईल यासाठी काँग्रेस पक्षाने काही समित्या नेमल्या आहेत. सर्व बाजूंचा विचार करून जागावाटप होणार आहे. जर गुणवत्तेनुसार जागावाटप झाले तर अन्य चर्चांना आळा बसेल. महाराष्ट्र हा काँग्रेसचा नेहमीच बालेकिल्ला राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. महापुरुषांचा अपमान आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपाला पराभूत करण्यासाठी आम्ही कंबर कसली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -
- Sameer Wankhede News समीर वानखेडेंना दिलासा अटकेपासून संरक्षण कायम मात्र कोणतीही माहिती माध्यमांना न देण्याची तंबी
- Sameer Wankhede News अतिक अहमद सारखी घटना होण्याची समीर वानखेडेंना भीती मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणार विशेष सुरक्षा
- Jayant Patil पुण्यात जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन भाजप आणि ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी