मुंबई : रजनी अशोक पाटील यांनी राजकारणाची सुरवात विद्यार्थी दशेतच केली होती. पुणे विद्यापीठात १९७९ मध्ये सिनेटची निवडणूक जिंकून त्या चळवळीत सक्रिय झाल्या होत्या. रजनी पाटील यांनी एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आपला राजकीय प्रवास सुरु केला होता. त्या १९७८ ते ८१ काळात त्या राज्याच्या ' एनएसयूआय' च्या सेक्रेटरी होत्या. तर १९८१ ते ८३ च्या काळात अखिल भारतीय स्तरावरील 'एनएसयूआय'च्या सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केले आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या सदस्य : पाटील यांनी प्रथम प्रथम महाराष्ट्राच्या सरचिटणीस म्हणुनही काम केले आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. याअगोदर पाटील यांनी खादी ग्रामोद्योग बोर्डाच्या जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय समाजकल्याण बोर्डाच्या अध्यक्ष, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, एनएसयूआय जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, राज्य बँकेच्या सहकारी बँकेच्या संचालक म्हणूनही काम केलेले आहे. त्यांनी पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले आहे. १९९१ मध्ये जवळबन ता. केज बीड जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणूनही निवडून आल्या होत्या.
भाजपला ठोकला रामराम : १९९० ते ९६ या काळात बीड जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली होती. १९९६मध्ये काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी माजी खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पाटील यांना भाजपकडून बीड लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, जिकंल्यानंतर त्यांनी काही दिवसातच भाजपला रामराम केला होता. 1998 साली त्यांनी भाजपला सोडचीठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राज्यसभेवर बिनविरोध निवड : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जवळच्या नेत्यापैकी पाटील एक आहेत. त्यांचा जन्म जन्म ५ डिसेंबर १९५८ साली वाळवा जि. सांगली तालुक्यातील बहिरवडगाव येथे झाला होता. रजनी पाटील यांचे वडील आत्माराम पाटील स्वातंत्र्यसैनिक होते. राज्यात मंत्रिपद भूषविलेल्या अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्यांमध्ये रजनी पाटील यांचा समावेश होतो. रजणी पाटील यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणुनही गौरवत करण्यात आला आहे. रजनी पाटील या महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाटील त्या मानस कन्या आहेत. २०१३ मध्ये त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती.
रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई : संसद कामकाजादरम्यान व्हिडिओ बनवणे काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना चांगलेच महागात पडले आहे. राज्यसभेचे अध्यक्ष तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी खासदारावर कडक कारवाई करत त्यांना चालू अधिवेशनातून निलंबित केले आहे. सभापती धनखड म्हणाले की, सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित त्यांनी काल एख व्हिडिओ ट्विटरवर प्रसारित केला होता. हा व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत पाटील यांच्यावर कारवाई केली आहे. यामध्ये काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याचे अध्यक्षांनी सांगितले, त्यानंतर त्यांना चालू अधिवेशनातून निलंबित करण्यात आल्याची माहिती धनखड यांनी दिली आहे.