ETV Bharat / state

काँग्रेसचे आमदार चार वाजता जयपूरहून मुंबईत होणार दाखल - काँग्रेसचे आमदारमुंबईत

गोवा आणि कर्नाटकप्रमाणे भाजपाकडून काँग्रेसच्या आमदार फोडले जातील या भीतीपोटी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना आठ नोव्हेंबरपासून राजस्थान मध्ये ठेवले होते. हे आमदार आज सायंकाळी चार वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ नेतेही मुंबईत पोहोचत असून सायंकाळी मुंबईत या आमदारांना पुन्हा एकदा सुरक्षित ठिकाणी ठेवले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Nov 11, 2019, 11:34 AM IST

मुंबई - सत्तास्थापनेसाठी भाजपाकडून आपले आमदार फोडले जाण्याच्या भीतीने मागील चार दिवसांपासून काँग्रेसने आपले आमदार राजस्थानमध्ये वास्तव्यासाठी ठेवले होते. हे आमदार आज सायंकाळी चार वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ नेतेही मुंबईत पोहोचत असून सायंकाळी मुंबईत या आमदारांना पुन्हा एकदा सुरक्षित ठिकाणी ठेवले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे

हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सविस्तर चर्चेनंतरच सत्तास्थापनेबाबत निर्णय होईल - शरद पवार

गोवा आणि कर्नाटकप्रमाणे भाजपाकडून काँग्रेसच्या आमदार फोडले जातील या भीतीपोटी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना आठ नोव्हेंबरपासून राजस्थान मध्ये ठेवले होते. आज त्यांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. ऐनवेळी राज्यात कोणत्याही घडामोडी झाल्या तर आमदार मुंबईत असणार आहेत. काल राजस्थान मध्ये काँग्रेस आमदारांच्या बैठकीत काँग्रेसकडून शिवसेनेला थेट पाठिंबा द्यावा आणि काही आमदारांनी बाहेरून पाठिंबा द्यावा, असे मत व्यक्त केले होते. त्यासंदर्भातील आमदारांच्या सह्यांचे निवेदन राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काही ज्येष्ठ नेते आज सोनिया गांधी यांना दिल्लीत देणार असून त्यानंतर काँग्रेसची भूमिका ठरणार आहे. मात्र त्यापूर्वी मुंबईत कोणतीही अडचण होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बोलवले आहेत. दुसरीकडे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली असून त्यात पक्षाची भूमिका जाहीर केली जाणार आहे.

Intro:काँग्रेसचे आमदार चार वाजता उतरणार मुंबईत

mh-mum-01-cong-mla-mumbai-7201153

मुंबई, ता. ११ :

सत्तास्थापनेसाठी भाजपाकडून आपले आमदार फोडले जाण्याच्या भीतीने मागील चार दिवसांपासून काँग्रेसने राजस्थान मध्ये आपले आमदार ठेवले होते. हे आमदार आज सायंकाळी चार वाजता मुंबईत पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ नेतेही मुंबईत पोहोचत असून सायंकाळी मुंबईत या आमदारांना पुन्हा एकदा सुरक्षित ठिकाणी ठेवले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.

गोवा आणि कर्नाटकप्रमाणे भाजपाकडून काँग्रेसच्या आमदार फोडले जातील या भीतीपोटी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना आठ नोव्हेंबरपासून राजस्थान मध्ये ठेवले होते. आज त्यांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. ऐनवेळी राज्यात कोणत्याही घडामोडी झाल्या तर आमदार मुंबईत असणार आहेत. काल राजस्थान मध्ये काँग्रेस आमदारांच्या बैठकीत काँग्रेसकडून शिवसेनेला थेट पाठिंबा द्यावा आणि काही आमदारांनी बाहेरून पाठिंबा द्यावा असे मत व्यक्त केले त्या संदर्भातील आमदारांच्या सह्यांचे निवेदन राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, यांच्यासह काही ज्येष्ठ नेते आज सोनिया गांधी यांना दिल्लीत भेटणार असून त्यानंतर काँग्रेसची भूमिका ठरणार आहे. मात्र त्यापूर्वी मुंबईत कोणतीही अडचण होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदार बोलवले आहेत. तर इकडे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली असून त्यात पक्षाची भूमिका जाहीर केली जाणार आहे.Body:
mh-mum-01-cong-mla-mumbai-7201153Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.