मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सिल्वर ओक' निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या ठिकाणी शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - राज्याने ठरवावे खरे बोलणारे हवेत की खोटे बोलणारे? - उद्धव ठाकरे
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याबाबत भाजप, शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरू असतानाच महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शरद पवारांची सकाळी भेट घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे.
हेही वाचा - ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा अखेर सुरळीत सुरू
शरद पवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. बिघडलेलं राजकीय वातावरण दुरुस्त करण्यात पवारांचा हातखंडा आहे. आताच्या परिस्थितीत काय करायला हवे, हा सल्ला घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.