ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांचे भाषण ओवैसीच्या विषारी झाडाला खतपाणी घालणारे - संजय निरुपम

author img

By

Published : Mar 4, 2021, 4:25 PM IST

Updated : Mar 4, 2021, 4:37 PM IST

राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बाबरी विध्वंसाबाबत उल्लेख केला होता. यावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम नाराज झाले असून मुख्यमंत्र्यांचे हे भाषण धर्मनिरपेक्षता सोडून ओवैसीच्या जहरी रोपाला खतपाणी घालणारे आहे, अशी टीका केली आहे.

sanjay nirupam
संजय निरुपम

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि. 3) राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना हिंदुत्व, शेतकरी, महागाई, स्वातंत्र्य लढा यावरून भाजपावर टीकास्त्र सोडले. चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून तुकाराम महाराजांच्या अभंगातील पाहिजे जातीचे येरेगबाळे न कामाचे ही ओळ ऐकवली होती. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी बाबरी पडल्यावर येरेगबाळे पळून गेले, अशी आठवण करुन देत शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, अशा शब्दात समाचार घेतला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन काँग्रेस पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्री आपली भूमिका सोडून औरंगाबादच्या एखाद्या चौकात शिवसैनिकाच्या नात्याने भाषण केल्यासारखे वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

बोलताना संजय निरुपम

हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग

संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटले की, काल (बुधवारी) मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे का, असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर उपस्थित केला आहे. संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी पाडल्याचा आनंद साजरा केला आणि तिथे उपस्थित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे?"

आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही

यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी, 'तुम्ही बाळासाहेबांची आठवण वेळोवेळी काढलीत त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. किमान तुम्ही त्यांना तरी विसरला नाहीत. विसरला नसाल तर त्याचं हिंदुत्व लक्षात ठेवा. त्यांचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नव्हतं. बाबरी पडल्यावर येरेगबाळे पळून गेले. एकटे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे राहिले,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. 'काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांसह सरकार स्थापन करणाऱ्या भाजपाचे हिंदुत्व भ्रष्ट झालेले असून , असेही मुख्यमंत्री म्हटले होते.

हेही वाचा - शिवसेना बंगाल निवडणूक लढवणार नाही, ममता बॅनर्जींना दिला पाठिंबा

Last Updated : Mar 4, 2021, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.