ETV Bharat / state

महाराष्ट्रद्रोही भाजपाकडून आता मराठी कलाकारांचाही अपमान - सचिन सावंत - सचिन सावंत भाजपा टीका

महाराष्ट्रद्रोही भाजपाकडून आता मराठी कलाकारांचाही अपमान होत आहे, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

sachin sawant, congress leader (file photo)
सचिन सावंत (नेते, काँग्रेस)
author img

By

Published : Sep 13, 2020, 7:50 PM IST

मुंबई - महाराष्ट्र आणि मुंबईच्या अस्मितेला शिव्याशाप देणाऱ्या तसेच महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान करणाऱ्या कंगणासारख्या कृतघ्न नटीचे समर्थन करतानाच भारतीय जनता पार्टीने आता आपल्या अक्कलेचे तारे तोडत मराठी कलाकारांचाही अपमान केला. मराठी कलाकारांची कमाई कंगणासारख्या नट्यांपेक्षा कमी असली तरी ते कंगणा आणि भाजपासारखे कृतघ्न, नाहीत. त्यांची नाळ मराठी माती आणि संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. आम्हाला या मराठी कलाकारांचा अभिमान आहे. त्यांचा अपमान करणाऱ्या भाजपाचा धिक्कार आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचा समाचार घेताना सचिन सावंत म्हणाले, मराठी कलाकार डोंबिवलीमध्ये राहत असले तरी त्यांच्या कलेचा दर्जा कमी नाही, हे अवधूत वाघसारख्यांना माहित नाही. कंगनासारख्या वाचाळ, मराठी व महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचवणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबई महापालिकेला बाबरसेना म्हणणाऱ्या नटीचे समर्थन करत भाजपाचे हे तीचे बोलविते धनी आहेत हे स्पष्ट आहे. यातूनच कंगणासारख्या पूर्वीच्या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या नटीची तुलना झाशीच्या राणीशी करणाऱ्यांची बौद्धिक पात्रता महाराष्ट्राने पाहिली आहे. आता मराठी कलाकारांबद्दल गरळ ओकून पुन्हा एकदा भाजपा हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे हे त्यांनीच दाखवून दिले आहे, अशी टीका सावंत यांनी केली. ते म्हणाले, मराठी कलाकार, त्यांच्या अभिनयाचा दर्जा व चित्रपट सृष्टीतले त्यांचे योगदान काय आहे? याचा अवधूत वाघसारख्या सुमार बुद्धीच्या लोकांनी अभ्यास करावा आणि मग मराठी कलाकारांबद्दल बोलावे, असा सल्लाही सावंत यांनी दिला आहे.

चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठीच होते. व्ही. शांताराम, रमेश देव, सीमा देव, डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, अश्विनी भावे यांच्यासारख्या शेकडो मराठी निर्माते, कलाकार तसेच असंख्य कलाकार व चित्रपटसृष्टीशी संबंधीत मराठी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने ही चित्रपटसृष्टी उभी राहिली आहे. त्याच जीवावर कंगनासारखे उपरे आज जगत आहेत. मराठी कलाकारांनी त्यांच्या दर्जेदार अभिनयाने जग जिंकले आहे. त्यांची नाळ मराठी मातीशी, संस्कृतीशी जोडलेली आहे, अशा कलाकारांना पैशाच्या तराजूत तोलून अवधूत वाघ यांनी त्यांचा अपमान केला आहे.

मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल भाजपाला नेहमीच आकस राहिला आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्राचे वैभव गुजरातला देऊन त्यांनी ते दाखवून दिलेच आहे. आता कंगनासारख्यांच्या दावणीला बांधून त्यांनी त्यांची पायरी स्वतःच दाखवून दिली आहे. मराठी कलाकारांचा आम्हाला अभिमान तर आहेच पण त्यांचा असा उपहास करणाऱ्या, कमाईवरून त्यांना हिणवणाऱ्या, कंगनाला झाशीची राणी आणि मराठी कलाकारांना रंक म्हणणाऱ्या भाजपा तीव्र शब्दात धिक्कार करत आहोत, अशी टीका सावंत यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.