ETV Bharat / state

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा - loksabha eletion

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा... काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतानी केली लोकायुक्तांकडे मागणी.., मुख्यमंत्र्यांनी २०१७ मध्ये चौकशीसाठी लोकायुक्तांकडे सोपवले होते प्रकरण

सचिन सावंत आणि प्रकाश मेहता
author img

By

Published : Apr 18, 2019, 5:16 PM IST

मुंबई - गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. पण अद्याप या प्रकरणी निकाल आला नाही. तो तत्काळ द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत लोकायुक्तांना पत्र लिहून केली आहे.

चौकशीचे पत्र
चौकशीचे पत्र

ऑक्टोबर २०१८ ला या प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयात शेवटची सुनावणी झाली असल्याची माहिती मिळते. या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता लोकायुक्त कार्यालयात संपर्क केला असता, हे प्रकरण अतिशय गोपनीय असून या संदर्भातील माहिती केवळ लोकायुक्तांच्याच कक्षात उपलब्ध आहे, असे सांगितले गेले. या संदर्भात चौकशी सुरू होऊन २ वर्ष होत आली व सुनावणी होऊन सहा महिने झाले. पण अद्याप निर्णय आलेला नाही. महाराष्ट्र तसेच देशातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागून असल्याने आपण लवकरात लवकर निकाल द्यावा आणि या प्रकरणातील गोपनीयतेवरून पडदा उठवावा ही अपेक्षा अपेक्षा असल्यांचे सावतांनी म्हटले आहे.

Intro:गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावाBody:गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा

काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी
 
मुंबई, ता.18 :
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. पण अद्याप या प्रकऱणी निकाल आला नाही. तो तात्काळ द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत लोकायुक्तांना पत्र लिहून केली आहे.
ऑक्टोबर २०१८ ला या प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयात शेवटची सुनावणी झाली होती असे समजते. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता लोकायुक्त कार्यालयात संपर्क केला असता हे प्रकरण अतिशय गोपनीय असून या संदर्भातील माहिती केवळ लोकायुक्तांच्याच कक्षात उपलब्ध आहे, असे सांगितले गेले. या संदर्भात चौकशी सुरु होऊन दोन वर्ष होत आली व सुनावणी होऊन सहा महिने झाले पण अद्याप निर्णय आलेला नाही. महाराष्ट्र तसेच देशातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागून असल्याने आपण लवकरात लवकर निकाल द्यावा आणि या प्रकरणातील गोपनीयतेवरून पडदा उठवावा ही अपेक्षा अपेक्षा आहे असे सावंत यांनी म्हटले आहे.

सोबत - लोकायुक्तांना लिहिलेल्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे.Conclusion:गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.