मुंबई - रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक पायपीट सुरू आहे. राज्य सरकारलाही या इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा उपलब्ध होत नाही, असे असताना भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना त्यांनी ही औषधे खाजगीरित्या कशी वाटली? भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते, हे यावरून उघड झाले आहे. त्यामुळे ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शन चोर भाजप नेत्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
अनधिकृतपणे पैसे घेतले
दमण प्रशासनाने ब्रूक फार्मा कंपनीला महाराष्ट्रात त्यांचे रेमडेसीवीर वितरण करण्यास परवानगी दिली नाही, असे कंपनीच म्हणते तर मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांना मार्ग दाखविणारे शिरीष चौधरी हे दरेकर व प्रसाद लाड यांच्याबरोबर दमणला गेले होते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होते. रेमडेसिवीर इंजेक्शन निर्यातीसाठी होते. तसेच त्याच्या वितरणासाठी एफडीएची परवानगी नव्हती आणि रेमडेसिवीरसारखे नोंदणीकृत औषध असे विकले जाणे व लोकांकडून अनधिकृतपणे पैसे घेतल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
लवकरच तक्रार दाखल करू
मुंबईतील रेमडेसिवीरच्या अवैध साठ्याप्रकरणी पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती. दोन्ही विरोधी पक्ष नेते फडणवीस व दरेकर यांनी केलेला गोंधळ समोर आला, असे म्हणत लवकरच यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल करु असेही सावंत म्हणाले.
हेही वाचा - 'ब्रेक द चेन’ : राज्य शासनाकडून 'या' दुकानांना वेळेचे निर्बंध; होम डिलिव्हरीस मुभा