ETV Bharat / state

नालेसफाईच्या कामांमधील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मागणी - मुंबईमधील नाल्यांची सफाई बातमी

मुंबईमधील नाल्यांची सफाई 31 मे पूर्वी केली जाते. यावर्षी मुंबईत 113 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. हा दावा पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित केला आहे. त्यामुळे हा दावा चुकीचा असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. आतापर्यंत कोणत्याही पालिका आयुक्तांनी असा दावा केला नसल्याची आठवण रवी राजा यांनी आयुक्तांना पत्राद्वारे करून दिली आहे.

नालेसफाईच्या कामांमधील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

author img

By

Published : Jul 3, 2020, 9:10 PM IST

मुंबई : मुंबईत जून महिना संपला तरी अद्याप नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून ही नालेसफाई त्वरित करून घ्यावी. तोपर्यंत ठेकेदारांचे बिल थांबवावे व संबंधीत ठेकेदाराला त्वरित काळ्या यादीत टाकावे अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रासोबत नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचे फोटो पुरावे म्हणून आयुक्तांना पाठवल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

मुंबईमधील नाल्यांची सफाई 31 मे पूर्वी केली जाते. यावर्षी मुंबईत 113 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. हा दावा पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित केला आहे. त्यामुळे हा दावा चुकीचा असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. आतापर्यंत कोणत्याही पालिका आयुक्तांनी असा दावा केला नसल्याची आठवण रवी राजा यांनी आयुक्तांना पत्राद्वारे करून दिली आहे.

29 व 30 जूनरोजी मुंबईमधील सायन प्रेमनगर, माहीम, वडाळा कोरबा मिठागर, शिवाजी नगर गोवंडी नाला, कुर्ला मिठी नदी नाला, घाटकोपर लक्ष्मी नगर, सोमय्या, खेरवाडी चमडावाला नाला, अंधेरी इंडियन ऑइल नाला, गोरेगाव ओशिवरा नाला, मालाड वळनाई नाला, कांदिवली लालाजीपाडा नाला, बोरिवली गोराई नाला यांची पाहणी केली असता त्यात 4 ते 5 फुटांचा गाळ आढळून आला आहे. काही नाल्यांची सफाई अर्धवट अवस्थेत असून नालेसफाईच्या गाळाची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याचे निदर्शनास आल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. नालेसफाई झाली असती तर थोड्याशा पावसात मुंबई तुंबली नसती. आयुक्तांनी केलेल्या दाव्यात आणि आपण केलेल्या पाहणीत तफावत आढळून आली नसती असे रवी राजा यांनी म्हटले आहे. पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून ही नालेसफाई त्वरित करून घ्यावी. तोपर्यंत ठेकेदारांचे बिल रोखून ठेवावे व संबधीत ठेकेदाराला त्वरित काळ्या यादीत टाकावे अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.