ETV Bharat / state

Jayaprakash Chhajed Death : कामगारांसहित सर्वसामान्यांचा नेता हरपला; नाना पटोलेंकडून जयप्रकाश छाजेडांच्या आठवणींना उजाळा - Nana Patole Reaction on Jayaprakash Chhajed

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे मंगळवारी (17 जानेवारी) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत छाजेड काँग्रेस विचारासाठी, कामगारांसहित सर्वसामान्यांना सोबत घेऊन काम करत राहिले. तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आज आपल्यात नाही, याचे दुःख आहे.

Jayaprakash Chhajed Death
जयप्रकाश छाजेड निधन
author img

By

Published : Jan 18, 2023, 5:37 PM IST

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत छाजेड काँग्रेस विचारासाठी, कामगारांसहित सर्वसामान्यांना सोबत घेऊन काम करत राहिले. तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आज आपल्यात नाही, याचे दुःख होते, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी जयप्रकाश छाजेड यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

जयप्रकाश यांना श्रद्धांजली : दादर येथील टीळक भवनात जयप्रकाश छाजेड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शोक सभेचे आयोजन केले होते. शोकसभेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, मा. खा. हुसेन दलवाई, रेल्वे युनियनचे प्रविण वाजपेयी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, राजेश शर्मा, राजन भोसले, जो. जो. थॉमस, प्रा. प्रकाश सोनावणे, आदी उपस्थित होते.

कामगारांचे प्रश्नांसावर काम : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, जयप्रकाश छाजेड शेवटपर्यंत पक्षाचे व इंटकचे काम प्रामाणिकपणे करत राहिले. ज्या दिवशी निधन झाले त्या दिवशीही ते नागपूरमधील कार्यकारिणीच्या सभेला जाण्याची तयारी करत होते. छाजेड यांच्याबरोबर एकत्र काम केले. कामगार वर्गासाठी लढा देणे हे सोपे काम नाही. परंतु महाराष्ट्र इंटकच्या माध्यमातून त्यांनी कामगारांसाठी चांगले काम केले. एस. टी. कामगारांचे प्रश्न ही ते वेळोवेळी लावून धरायचे.

आठवणी कायम स्मरणात : ते पुढे म्हणाले की, शासनाकडे सतत पाठपुरावा करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विधान परिषदेतही त्यांनी कामगारांचे प्रश्न हिरीरीने मांडले. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता, लोकांशी ते सतत जोडलेले होते. कामगार क्षेत्राबरोबर सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रातही ते कार्यरत असत. जयप्रकाश छाजेड यांचे निधन झाले असले तरी त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

हीच त्यांनी खरी श्रद्धांजली : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी सांगितले की, जयप्रकाश छाजेड हे एखादी जबाबदारी स्विकारली की ती तडीस नेत होते. कामगार, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी मोठे काम केले. कामगारांच्या अनेक समस्या सोडण्यासाठी त्यांच्यासोबत एकत्र काम केले. असंघटीत क्षेत्रासाठी पहिला कायदा महाराष्ट्राने केला त्यात जयप्रकाश छाजेड यांचे ही मोठे योगदान होते. कामगार क्षेत्रातील आव्हाने आता पूर्णपणे बदलली आहेत, चेहरा मोहरा बदलला आहे. या क्षेत्रासाठी आता जास्त काम करावे लागणार आहे, याची जाण ठेवून छाजेड यांचे अपूर्ण राहिलेले काम आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा भावना भाई जगताप यांनी व्यक्त केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.