ETV Bharat / state

अर्णब गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल करा - भाई जगताप - काँग्रेस बातमी

एका वृत्त वाहिनीचे संपादक असलेल्या अर्णब गोस्वामीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याकडे केली आहे.

भाई जगताप
भाई जगताप
author img

By

Published : Jan 27, 2021, 4:50 PM IST

Updated : Jan 27, 2021, 5:28 PM IST

मुंबई - टीआरपी घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थो दासगुप्तासह एका वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या दरम्यान घडलेल्या व्हाट्सअ‌ॅप चॅटच्या मुद्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आलेली आहे.

बोलताना भाई जगताप

...म्हणून गोस्वामी विरोधात तक्रार

अर्णब गोस्वामी ही व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे भाई जगताप यांनी म्हणाले. अर्णब गोस्वामीच्या चॅटमध्ये देशाच्या संरक्षणाविषयी बाबी उघड करण्यात आलेल्या आहेत. त्या दिल्लीतील कार्यालयामधून त्यांना मिळाल्या आहेत का? किंवा सुरक्षा विभागांमधून ही माहिती अर्णब गोस्वामीपर्यंत पोहोचली आहे का ? याचा तपास पोलिसांकडून करण्यात यावा म्हणून तक्रार देत असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले आहे.

गोस्वामीकडून पैसे मिळाल्याचे पार्थो दासगुप्तांनी केले कबूल

दरम्यान, टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना बी.आर.ए.सी.चा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ताला अटक केल्यानंतर त्याने स्वतः लिहून दिलेल्या जबाबात अर्णब गोस्वामीकडून त्यास 12 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच 40 लाख रुपये रोकड मिळाल्याचे कबूल केलेले आहे. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी हे पैसे दिल्याचे पार्थो दासगुप्ता यांनी त्याच्या जबाबात कबूल केलेल आहे. पार्थो दासगुप्ता सध्या जेजे रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून या अगोदरच न्यायालयाकडून त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे.

हेही वाचा - सेवानिवृत्तीचे वय वाढवू नये; कनिष्ठ डॉक्टरांचे आझाद मैदानात आंदोलन

Last Updated : Jan 27, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.