ETV Bharat / state

पवारांवरील कारवाईबाबत काँग्रेस नेते गप्प का? इतिहासात दडलीत कारणे!

राष्ट्रवादीचे नुकसान होणार असेल तर ते आपल्याच फायद्याचे आहे हे काँग्रेस नेत्यांना वाटत असावे, अशी चर्चा आहे. त्यामुळेच एकही बडा काँग्रेस नेता शरद पवारांच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही.

पवारांवरील कारवाईबाबत काँग्रेस नेते गप्पा का? इतिहासात दडलीत कारणे!
author img

By

Published : Sep 26, 2019, 2:59 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा नोंदवला आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. पवारांबाबत सहानुभूतीही व्यक्त करण्यात आली. तर काहींनी कारवाईचे समर्थनही केले. यात सर्वांपासून लांब होते ते काँग्रेस नेते. काँग्रेसच्या राज्यातील एकाही बड्या नेत्याने पवारांवरील कारवाईचा विरोध केला नाही, किंवा प्रतिक्रियाही दिली नाही. या मागे नक्की काय कारणे आहेत याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात जोरदार सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक बरखास्त करण्याचा निर्णय हा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच घेतला होता. यातून त्यांना एका दगडात दोन पक्षी मारायचे होते. राष्ट्रवादीला या कारवाईमुळे चाप बसणार होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या बँकेचे संचालक होते. स्वत:च्या सरकारनेच बँक बरखास्त केल्याने अजित पवारांची कोंडी झाली होती. शिवाय या निर्णयाचे समर्थन करण्या शिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीचे नुकसान होणार असेल तर ते आपल्याच फायद्याचे आहे, हे काँग्रेस नेत्यांना वाटत असावे अशी चर्चा आहे. त्यामुळेच एकही बडा काँग्रेस नेता शरद पवारांच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही.

शरद पवारांनीच राज्यातील काँग्रेस संपवली असे काँग्रेसचेच नेते खासगीत सांगत असतात. काँग्रेसमधील एक गट तर पवारांचा कट्टर विरोधक आहे. या विरोधामुळेच या गटाचे दिल्ली हायकमांड समोर वजनही आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अडचणी वाढणार असतील तर या गटाला आनंदच वाटणार आहे. काँग्रेस फोडून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस बनवली. त्याआधीचा इतिहासही तसाच आहे. वसंतदादा पाटलांचे सरकार पाडण्यातही पवारांचाच हात होता. शिवाय सोनिया गांधीना पंतप्रधान पदापासून रोखण्यातही पवारांनी पुढाकार घेतला होता. सोनिया गांधी अध्यक्ष असताना त्यांच्या विदेशी पणाचा मुद्दाही पवारांनी मांडला होता. हे काँग्रेसनेते विसरले नाहीत. शिवाय त्यांना सोनिया गांधी अध्यक्ष होण्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे होते त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमधून फुटूनच तयार झाला पक्ष आहे. त्यांचे मुळ हे काँग्रेसमध्येच आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्वही एक खांबी आहे. ते शरद पवारांच्या भोवतीच फिरत आहे. अजित पवारांनाही शरद पवारांनी दम भरायला मागे पुढे पाहिला नाही. मीच अध्यक्ष आणि पक्षाचे निर्णय मीच घेणार हे जाहीर सभांमधून पवारांनी सांगितलेले आहे. त्यामुळेच पवारांच्या अडचणी वाढल्या की त्यांच्या भोवतीचे सर्व जण आपोआप गळून पडणार आहेत, असे राजकीय तज्ञांनाही वाटते. त्यामुळेच की काय हे सर्व पुन्हा काँग्रेसमध्येच येतील आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडेल असे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच सध्या तरी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सावध भूमिका घेतली नसेल ना? अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

Intro:Body:

पवारां वरील कारवाईबाबत काँग्रेस नेते गप्पा का ? इतिहासात दडलीत कारणे !

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा नोंदवला आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. पवारां बाबत सहानुभूतीही व्यक्त करण्यात आली. तर काहींनी कारवाईचे समर्थनही केले. यात सर्वांपासून लांब होते ते काँग्रेस नेते. काँग्रेसच्या राज्यातील एकाही बड्या नेत्याने पवारां वरिल कारवाईचा विरोध केला नाही, किंवा प्रतिक्रीयाही दिली नाही. या मागे नक्की काय कारणे आहेत याची चर्चा सध्या राजकिय वर्तूळात जोरदार सुरू आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक बरखास्त करण्याचा निर्णय हा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच घेतला होता. यातून त्यांना एका दगडात दोन पक्षी मारयचे होते. राष्ट्रवादीला या कारवाईमुळे चाप बसणार होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या बँकेचे संचालक होते. स्वत:च्या सरकारनेच बँक बरखास्त केल्याने अजित पवारांची कोंडी झाली होती. शिवाय या निर्णयाचे समर्थन करण्या शिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीचे नुकसा होणार असेल तर ते आपल्याच फायद्याचे आहे हे काँग्रेस नेत्यांना वाटत असावे अशी चर्चा आहे. त्यामुळेच एकही बडा काँग्रेस नेता शरद पवारांच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही. 

शरद पवारांनीच राज्यातील काँग्रेस संपवली असे काँग्रेसचेच नेते खाजगीत सांगत असतात. काँग्रेसमधील एक गट तर पवारांचा कट्टर विरोधक आहे. या विरोधामुळेच या गटाचे दिल्ली हायकमांड समोर वजनही आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अडचणी वाढणार असतील तर या गटाला आनंदच वाटणार आहे. काँग्रेस फोडून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस बनवली. त्याआधीचा इतिहासही तसाच आहे. वसंतदादा पाटलांचे सरकार पाडण्यातही पवारांचाच हात होता. शिवाय सोनिया गांधीना पंतप्रधान पदापासून रोखण्यातही पवारांनी पुढाकार घेतला होता.  सोनिया गांधी अध्यक्ष असताना त्यांच्या विदेश पणाचा मुद्दाही पवारांनी मांडला होता.  हे काँग्रेसनेते विसरले नाहीत. शिवाय त्यांना सोनिया गांधी अध्यक्ष होण्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे होते त्यांनी  काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमधून फुटूनच तयार झाला पक्ष आहे. त्यांचे मुळ हे काँग्रेसमध्येच आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्वही एक खांबी आहे. ते शरद पवारांच्या भोवतीच फिरत आहे. अजित पवारांनाही शरद पवारांनी दम भरायला मागे पुढे पहीला नाही. मीच अध्यक्ष आणि पक्षाचे निर्णय मीच घेणार हे जाहीर सभांमधून पवारांनी सांगितलेले आहे. त्यामुळेच पवारांच्या अडचणी वाढल्या की त्यांच्या भोवतीचे सर्व जण आपोआप गळून पडणार आहेत असे राजकीय तज्ञांनाही वाटते. त्यामुळेच की काय हे सर्व पुन्हा काँग्रेसमध्येच येतील आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडेल असे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच सध्या तरी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सावध भूमिका घेतली नसेल ना?  अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे.      

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.