मुंबई- बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच महामंडळाच्या बाबतीत काँग्रेसला अधिकचा वाटा मिळावा या मुद्द्यावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळच्या सुमारास पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महामंडळे, राजकीय परिस्थिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच राज्यातील कोरोना परिस्थिती आणि अनलॉक संदर्भातही यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे.
बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतल्याचं ट्विट करून सांगण्यात आले. मात्र या भेटीमध्ये खास करून राज्यातल्या महामंडळांच्या बाबतीत चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकार मध्ये महामंडळा बाबतीत काँग्रेसच्या वाट्याला जास्त महामंडळ द्यावीत याबद्दल देखील शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राज्यात आजपासून केलेला अनलॉक, कोरोनाची राज्यातील परिस्थिती आणि राज्यासमोर उद्भवलेले पदोन्नती आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; महामंडळ वाटपावर चर्चा? - शरद पवारांच्या भेटीला थोरात