ETV Bharat / state

...अखेर मंत्री थोरात अन् चव्हाण यांच्या मुख्यमंत्री भेटीला मिळाला मुहूर्त

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी होणारी भेट मागील काही दिवसांपासून पुढे ढकलली जात होती. या भेटीला आज मुहूर्त लागला असून दुपारी दीड वाजता बैठक होणार आहे.

edited news
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 18, 2020, 12:16 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रमुख नेते यांची दोन आठवड्यांपासून ठरलेली भेटीला आज मुहूर्त लागला आहे. आज दुपारी दीड वाजता बैठक होणार आहे. मागील काही दिवसात ही भेट अनेकदा पुढे ढकलली होती. आता त्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 18 जून) वेळ दिला असल्याने ही भेट अखेर आज निश्चित झाली आहे. या भेटीदरम्यान काँग्रेसच्या अजेंड्यावर प्रामुख्याने राज्यात संकटात सापडलेल्या जनतेला 'न्याय योजना' लागू करावी ही प्रमुख मागणी लावून धरली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे प्रमुख दोन नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांच्या संदर्भात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून त्या नाराजीवरही या भेटीत चर्चा केली जाणार आहे. त्यासोबत प्रधान सचिव अजोय मेहता यांच्या कार्यपद्धतीवर आपली नाराजी काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

राज्यात कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या जनतेला सरकारने दिलासा द्यावा, म्हणून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जाहीर केलेली न्यायही योजना राज्यात लागू करावी यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यामध्ये किमान काही रक्कम टाकण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, याचा एक आराखडा काँग्रेस नेत्यांनी तयार केला आहे. त्यामुळे आजच्या या भेटीदरम्यान न्याय योजनेची ही मागणी प्रामुख्याने केली जाणार असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - चीनचा हल्ला..! पंतप्रधान जनतेसमोर न येणे धक्कादायक; सामनातून मोदींची कानउघडणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.