ETV Bharat / state

'दिल्लीत भाजपच्या पराभवाचे एकमेव कारण काँग्रेस' - चंद्रकांत पाटील दिल्ली निवडणूक निकाल मत

दिल्लीत मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या जागांमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत काँग्रेसने आपले मतदार आपकडे वळवले. हा प्रयोग संपूर्ण देशभर सुरू आहे मात्र, या प्रयोगाला भाजप घाबरत नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Feb 11, 2020, 5:25 PM IST

Updated : Feb 11, 2020, 6:18 PM IST

नवी मुंबई - दिल्लीमध्ये भाजपच्या पराभवाचे काँग्रेस हे एकमेव कारण आहे. काँग्रेसने सपशेल शरणागती पत्करल्याने त्यांची मतदार आम आदमी पक्षाकडे वळली. हिंमत असेल तर सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे भाजप समोर तग धरून दाखवावा, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते नवी मुंबईतील नेरुळमध्ये येत्या १६ फेब्रुवारीला होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशन स्थळाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'दिल्लीत भाजपच्या पराभवाचे एकमेव कारण काँग्रेस'

दिल्लीत मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या जागांमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत काँग्रेसने आपले मतदार आपकडे वळवले. हा प्रयोग संपूर्ण देशभर सुरू आहे मात्र, या प्रयोगाला भाजप घाबरत नाही. ज्या दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित 15 वर्ष मुख्यमंत्री होत्या तेथे काँग्रेसची एकही जागा निवडूण आली नाही. याचा अर्थ न कळण्याइतके लोक मूर्ख राहिले नाहीत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा - दिल्ली निवडणुकीमुळे मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात शुकशुकाट, भाजप नेते फिरकलेच नाहीत

वरळीत होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या नवीन कार्यालयाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता, पक्षातील सर्व नेत्यांची कार्यालये आहेत. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत. ज्यावेळी त्या औरंगाबादला मराठवाडयाच्या पाणी प्रश्नासाठी उपोषणाला बसल्या त्यावेळी त्यांना भेटायला देवेंद्र फडणवीस गेले होते. आता त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनालाही जाणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दिल्ली निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपला उशिर झाला

महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये विधान सभेचे काम सुरू असल्याने दिल्ली निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपला उशीर झाला. महाराष्ट्रात निवडणुकीसाठी खुप कामे करण्यात आली. 1 कोटी लोकांची नव्याने मेंबरशिप घेण्यात आली. महाराष्ट्रात सगळ्या जास्त नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हे भाजपचे आहेत. सद्यस्थितीत सरकार जे प्रकल्प रद्द करत आहेत, त्या संदर्भात जनादेशाचा अनादार हा प्रस्ताव मांडणार आहोत. महाविकासआघाडी सरकारमध्ये रोज वेगवेगळ्या पक्षाचे मंत्री घोषणा करत आहेत व दुसऱ्या पक्षाचे मंत्री ते रद्द करत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Intro:दिल्लीत भाजपच्या पराजयाचे एकमेव कारण हे काँग्रेस आहे-चंद्रकांत पाटील

या निवडणुकीत काँग्रेसने शरणागती पत्करली व आपली वोट बँक " आप, कडे वळवली.

नवी मुंबई:

दिल्लीत भाजपच्या पराजयाचे एकमेव कारण हे काँग्रेस आहे. काँग्रेसने शरणागती पत्करली काँग्रेसने आपली वोट बँक " आप, कडे वळवली.हिंमत असेल तर सर्व पक्षांनी एक एकटे भाजप समोर लढून दाखवावे. असे माजी. महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले ते नवी मुंबईतील
नेरुळमध्ये येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणा-या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या अधिवेशन स्थळाची आज पाहणी करून तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.
दिल्लीत गेल्या निवडणूकीच्या तुलनेत भाजपच्या विजयी जागात (सीटस) मध्ये चारपट वाढ झाली आहे." दिल्लीत भाजपच्या पराजयाचे एकमेव कारण हे काँग्रेस आहे. या निवडणुकीत काँग्रेसने शरणागती पत्करली व आपली वोट बँक " आप, कडे वळवली.हा सर्वपक्षीय प्रयोग देशभर सुरू आहे, मात्र या प्रयोगाला आम्ही घाबरत नाही. सगळयांनी एकत्र यायचं मात्र भारतीय जनता पक्ष येता कामा नये ही रणनीती सगळीकडेचं सुरू आहे त्यामुळे असं झालं आहे,
की,ज्या दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या काँग्रेसचे 15 वर्ष सरकार होते त्या दिल्लीत काँग्रेसची एकही जागा निवडुन येत नाही याचा अर्थ न कळण्याइतके लोकं मूर्ख राहिले नाहीत.वरळीत पंकजा मुंडे यांचे नवीन होणाऱ्या कार्यालया बद्दल त्यांना प्रश्न विचारला असता, आमची सगळ्यांची कार्यालय आहेत,माझी स्वतःची संवेदना नावाची ट्रस्ट आहे जी मुलींच्या शिक्षणावर काम करत आहे.पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला तुम्ही जाणार का?? असा प्रश्न विचारला असता हो जाणार ना, असे उत्तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. पंकजाताई या आमच्या नेत्या आहेत, ज्यावेळी त्या औरंगाबादला मराठवाडयाच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसल्या त्यावेळी त्यांना भेटायला स्वतः देवेंद्र फडणवीस गेले होते, तसेच आम्ही त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनालाही जाणार असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.Body:.Conclusion:.
Last Updated : Feb 11, 2020, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.