ETV Bharat / state

'प्रकाश जावडेकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी'

मोदी सरकारच्याच माहितीने जावडेकरांचा हा खोटारडेपणा उघड झाला आहे. चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या जावडेकरांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

प्रवक्ते सचिन सावंत
प्रवक्ते सचिन सावंत
author img

By

Published : May 4, 2021, 5:34 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने राज्यांना मदत करणे अपेक्षित आहे. मात्र केंद्र सरकार हे कोरोनाच्या लढ्यात अपयशी ठरले असून या संबंधी केंद्र सरकारचे नियोजनशून्य कारभार असल्याची टीका, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. मात्र आपल्या चुकांचे खापर केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारवर फोडत असून स्वतः नामनिराळे राहण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा करत असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांचे ट्विट
सचिन सावंत यांचे ट्विट

'प्रकाश जावडेकर महाराष्ट्राची माफी मागावी'

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राला केंद्राकडून लसी दिल्या जातात त्या लसीचे अपव्यय होण्याची सरासरी खोटी सांगण्यात आली, असल्याचे सचिन सावंत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लसींचा अपव्यय ६% नसून तो केवळ ०.२२% आहे. मोदी सरकारच्याच माहितीने जावडेकरांचा हा खोटारडेपणा उघड झाला आहे. चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या जावडेकरांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

'..म्हणून लसीकरण केंद्रे बंद'

कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र धैर्याने काम करत असून लसीकरणात महाराष्ट्राने देशासमोर आदर्श घालून दिला आहे. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे, ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले व लसींचा कमीतकमी अपव्यय ठेवला. परंतु दु:ख याचे वाटते की जावडेकरांसारखे भाजपा नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहेत. लसींचा पुरवठा नसल्याने राज्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत, लोकांमध्ये लस घेण्यासाठी दांडगा उत्साह आहे, लसीकरण केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत, पण अपुऱ्या लसींमुळे त्यांना हात हलवत परत जावे लागत आहे. गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रात फक्त २३५४७ लसी कालपर्यंत शिल्लक होत्या. नवीन लसीच्या साठ्याचे आश्वासन दिले आहे. परंतु नरेंद्र मोदींनी जर वेळेवर लसी देत नसतील तर महाराष्ट्राने जनतेची सेवा कशी करावी? नियोजन कसे करावे? उठसुठ खोटे आरोप करुन महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा महाराष्ट्राला योग्य त्या प्रमाणात वेळेवर लशी देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा, असे सावंत म्हणाले.

'आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबवा'

अशोका विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर डाटा अँड अ‌ॅनालिसिस' या विभागाच्या 'कोविड वॅक्सिनेशन प्रोग्राम-नॉट अ रोझी पिक्चर' ( Covid vaccination program- Not a rozy picture by CEDA dept of Ashoka University) या अहवालात दर्शविल्याप्रमाणे कोरोना रुग्णसंख्या व लोकसंख्या या निकषावर लसी वाटपात महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचेही स्पष्ट झाले आहे. तसेच ४५ वर्षांवरील लोकसंख्येचा विचार करता यातही लस वाटपात महाराष्ट्र १४ व्या स्थानी आहे. इतक्या कमी प्रमाणात लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत आहे. परंतु महाराष्ट्राला केंद्राने सर्वाधिक लसी दिल्याचा अपप्रचार राज्यातील भाजपा नेत्यांकडून होत आहे. लसींचा पुरेसा साठा आहे, महाराष्ट्राला योग्य त्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात आहे, असे जावडेकर व केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन धादांत खोटे सांगत आहेत हे स्पष्ट झाले आहे. विरोधी पक्षाचे सरकार आहे या मानसिकतेतून महाराष्ट्राशी सुरू असलेली सापत्नभावाची वागणूक सोडा आणि १३ कोटी जनतेच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबवा अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही सावंत यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -लसीकरणासाठी प्रत्येक वयोगटासाठी वेगळी रांग करून वरिष्ठांचा मनस्ताप टाळावा, भाजपाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.