ETV Bharat / state

...तर पुढच्या ऑलंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडू जास्त पदक मिळवतील - शकील अहमद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारा'चे नाव बदलू 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाविरोधात टीका करण्यात आली आहे.

author img

By

Published : Aug 8, 2021, 7:59 PM IST

Updated : Aug 8, 2021, 8:25 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारा'चे नाव बदलू 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' ठेवण्याची घोषणा केली. पुरस्काराच्या नावात बदल करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंसाठीच्या सोई-सुविधेसाठी प्रयत्न केल्यास पुढील ऑलंपिकमध्ये भारतीय खेळाडू आणखी जास्त पदक आपल्या देशासाठी आणतील, अशी प्रतिक्रिया मुंबईतील सामाजिक कार्यकर्ता शकील अहमद यांनी दिली.

बोलताना सामाजिक कार्यकर्ता

नवात बदल झाल्याने काँग्रेसकडून टीका

पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर देशातील सर्व स्तरातून या घोषणेबाबत चर्चा सुरू झाली आहे. खास करून काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर टीका केली आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नावाने केंद्र सरकार नवीन पुरस्कार जाहीर करू शकत होती. मात्र, तसे न करता केवळ राजकारण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचे नाव बदलले, असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. तर भाजप आणि केंद्र सरकारला समर्थन देणाऱ्या पक्षाच्या नेत्यांकडून पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून जुन्या योजनांना नवीन नावे

केंद्रात सत्ता कोणत्याही पक्षाची असो, त्या पक्षाचा विचारधारेच्या आधारावर केंद्र सरकार नवीन योजना किंवा जुन्या असलेल्या योजनांचे नामकरण नव्याने केल्याचा इतिहास आपल्या देशात काही आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना गांधी कुटुंबीयांच्या नावांवर अनेक योजना आणि संस्था काँग्रेस सरकारने सुरू केल्याचा आरोप त्याकाळी करण्यात आला होता. तर, केंद्रात मोदींचे सरकार आल्यापासून काँग्रेसने तयार केलेल्या जुन्या योजनांचा नाव बदलण्याचा घाट केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेस पक्षाकडून केला जातो आहे. देशाची सत्ता मोदी सरकारकडे गेल्यानंतर काँग्रेसमधील अशा काही योजना आहेत, ज्यांची नावे बदलून नव्या रूपाने या योजना केंद्र सरकारने लागू केल्या.

मोदी सरकारने बदललेल्या योजनांचे नाव

  • काँग्रेसने सुरू केलेली 'इंदिरा आवास योजना' मोदी सरकारच्या काळात 'पंतप्रधान आवास योजने'च्या नावाने सुरू झाली आहे.
  • 'इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना' आता मोदी सरकारच्या काळात 'पंतप्रधान मातृ वंदना योजना' नावाने ओळखली जाते.
  • 'राजीव आवास योजने'चे नाव बदलून आता 'सरदार पटेल राष्ट्रीय शहरी आवास मिशन' या नावाने सुरू आहे.
  • 'जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण योजने'चे नाव आता 'पंतप्रधान आवास योजना (शहरी) कार्यालय (अटल मिशन)' या नावाने सेवेत आहे.
  • 'प्रवासी भारतीय केंद्रा'चे नाव आता 'सुषमा स्वराज भवन', असे ठेवण्यात आले आहे.
  • 'मोटेरा स्टेडियम'चे नाव बदलून आता 'नरेंद्र मोदी स्टेडियम',असे नामकरण करण्यात आले.
  • दिल्लीतील 'फिरोजशहा कोटला मैदान' आता 'अरुण जेटली स्टेडियम' म्हणून ओळखले जात आहे.
  • 'इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अॅण्ड अॅनालेसिस' ही संस्था 'मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अॅण्ड अॅनालेसिस' नावाने सुरू आहे.
  • तर 'मुगलसराय जंक्शन'ला 'दीनदयाल उपाध्याय जंक्शन' म्हणून घोषित करण्यात आल आहे.
  • यामध्ये आता नव्याने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराची भर पडली आहे.

अशाप्रकारे काही योजना, संस्था किंवा मैदानांची नावे बदलून मोदी सरकारने त्यांना नव्याने नाव दिली.

राज्यात 2019 साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेही काही योजना आणि प्रकल्प सुरू केले गेले.

महाविकास आघाडी सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरू केलेल्या काही नव्या योजना

  • स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
  • बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी योजना
  • बाळासाहेब ठाकरे स्मुर्ती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
  • हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना

अशा नव्या योजना महाविकास आघाडी सरकारकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषित केल्या आहेत.

हेही वाचा - दिल्ली वारीचा मॅसेज मातोश्रीवर, संजय राऊत-मुख्यमंत्र्यांची भेट

Last Updated : Aug 8, 2021, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.