ETV Bharat / state

जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत जागा वाटपाचा विषय मार्गी लावण्यासाठी आज मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.

author img

By

Published : Jul 23, 2019, 7:09 PM IST

Updated : Jul 23, 2019, 7:56 PM IST

जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी झाली. या महाआघाडीत जागा वाटपाचा विषय मार्गी लावण्यासाठी आज मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्या बंगल्यावर या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित आहेत.

या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत इतर समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेताना त्यांना जागा वाटपात किती स्थान द्यायचे? यावर प्रामुख्याने चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजप आणि सेनेकडून काढण्यात येत असलेल्या जनआशीर्वाद आणि महाजनादेश यात्रा याला प्रत्युत्तर देण्याच्या विषयावर रणनीती ठरवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Intro:जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू

मुंबई, ता. 23 :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या महाआघाडीत जागा वाटपाचा विषय मार्गी लावण्यासाठी आज मुंबईत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्या बंगल्यावर या या बैठकीला सुरुवात झाली असून यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदर्शध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित आहेत.

या बैठकीत कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत इतर समविचारी पक्षांना, संघटनांना सोबत घेताना त्यांना जागा वाटपात किती स्थान द्यायचा यावर प्रामुख्याने चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे राज्यात भाजप आणि सेनेकडून काढण्यात येत असलेल्या जन आशीर्वाद आणि महाजनादेश यात्रा याला प्रत्युत्तर देण्याच्या विषयावर रणनीती ठरवली जाणार असल्याचे।सांगण्यात येते.

Body:जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू

Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.