ETV Bharat / state

...म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भरवले मोदींच्या छायाचित्राला लाडू - काँग्रेसचे आंदोलन बातमी

सतत होणाऱ्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मुंबईतील मुलुंड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या छायाचित्राला लाडू भरवला.

agitation
मोदींच्या फोटोला लाडू भरवताना काँग्रेस कार्यकर्ते
author img

By

Published : Jul 1, 2020, 8:56 PM IST

मुंबई - एकीकडे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. तरीही प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या भाजप सरकारद्वारे इंधनाच्या किंमतीत अमर्याद वाढ केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी मुलुंड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपावर प्रधानमंत्री मोदींच्या छायाचित्रास लाडू भरवण्यात आले.

बोलताना काँग्रेस प्रवक्ते

देशातील इतिहासात पाहिलांदा डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त झाली आहे. त्याचबरोबर सन 2014 पासून इंधन उत्पादन शुल्कावर मोठी वृद्धी आणि लागोपाठ 22 दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेलच्या दरवाढीमुळे आता शंभर रुपये रूपये प्रति लीटर होण्यापासून केवळ 12 ते 15 रूपये मागे आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

आर्थिक मंदीचा सामना करत असलेल्या भारतातील सामान्य नागरिकांचा खिसा कापून सरकार केवळ नफाखोरी करत आपली तिजोरी भरताना दिसत असल्याचा आरोप काँग्रेसने केंद्र सरकारवर केला आहे. पेट्रोलचे दर लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 22 दिवस सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच पेट्रोल 258 टक्क्यांनी तर डिझेल 820 टक्क्यांनी वाढली आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत कमी होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहे. मोदी सरकारने एवढी महागाई केली आहे. पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. यामुळे हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करावी, घोषणाबाजी मोदी सरकारने बंद करावी, असे काँग्रेसचे मुंबई प्रवक्ते चरणसिंग सप्रा यांनी सांगितले.

हेही वाचा - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगारविषयक मार्गदर्शनासाठी आता ऑनलाइन कौन्सिलिंग सत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.