मुंबई - मोदी लाटेत दुसऱ्यांदा काँग्रेस देशभरात वाहून गेली, महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला असून आता विधानसभेचीही वाट बिकट असल्याचे चित्र दिसत आहे. एकट्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी केवळ दोन मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. तर चार मतदारसंघात भाजप-शिवसेनेची युती आघाडीवर आहे. त्यामुळे पुढच्या चार महिन्यात येणाऱ्या विधानसभेतही काँग्रेस आघाडीची वाट अतिशय बिकट असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दक्षिण मुंबईतल्या वरळी, शिवडी, मलबार हिल आणि कुलाबा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांच्या तुलनेत जवळ-जवळ दुप्पट मते घेतली आहेत. तर केवळ भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघात देवरा यांना आघाडी मिळाली आहे. भायखळा मतदारसंघात सध्या एमआयएमचे वारीस पठाण आमदार आहेत. तर मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत. यातच वंचित आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांवर आपला प्रभाव टाकला. त्यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढली असून आगामी विधानसभेतही त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर अनिल कुमार यांनी ३० हजार ३४८ मते घेतली आहेत.मात्र, विधानसभा निवडणुकीत याही मताला महत्व असणार आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय मते
विधानसभा महायुती काँग्रेस वंचित
वरळी 78653 42499 11584
शिवडी 91497 41645 5220
भायखळा 47627 76302 5352
मलबार हिल 99269 40700 1425
मुंबादेवी 38969 73833 1989
कुलाबा 64515 46378 4643
विधानसभेसाठीही मुंबईत आघाडीची वाट बिकट, लोकसभेला अनेक मतदारसंघात युतीची मुसंडी - मुंबई
विधानसभेतही मुंबईत आघाडीची वाट बिकट, अनेक मतदारसंघात भाजप-शिवसेनेला आघाडी...वंचित आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांवर आपला प्रभाव टाकला आहे. त्यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढली असून आगामी विधानसभेतही त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
मुंबई - मोदी लाटेत दुसऱ्यांदा काँग्रेस देशभरात वाहून गेली, महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला असून आता विधानसभेचीही वाट बिकट असल्याचे चित्र दिसत आहे. एकट्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी केवळ दोन मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. तर चार मतदारसंघात भाजप-शिवसेनेची युती आघाडीवर आहे. त्यामुळे पुढच्या चार महिन्यात येणाऱ्या विधानसभेतही काँग्रेस आघाडीची वाट अतिशय बिकट असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दक्षिण मुंबईतल्या वरळी, शिवडी, मलबार हिल आणि कुलाबा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांच्या तुलनेत जवळ-जवळ दुप्पट मते घेतली आहेत. तर केवळ भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघात देवरा यांना आघाडी मिळाली आहे. भायखळा मतदारसंघात सध्या एमआयएमचे वारीस पठाण आमदार आहेत. तर मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत. यातच वंचित आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांवर आपला प्रभाव टाकला. त्यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढली असून आगामी विधानसभेतही त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर अनिल कुमार यांनी ३० हजार ३४८ मते घेतली आहेत.मात्र, विधानसभा निवडणुकीत याही मताला महत्व असणार आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय मते
विधानसभा महायुती काँग्रेस वंचित
वरळी 78653 42499 11584
शिवडी 91497 41645 5220
भायखळा 47627 76302 5352
मलबार हिल 99269 40700 1425
मुंबादेवी 38969 73833 1989
कुलाबा 64515 46378 4643
मुंबई 26
मोदी लाटेत दुसऱ्यांदा काँग्रेस देशभरात वाहून गेली, महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला असून आता विधानसभेची ही वाट बिकट असल्याचे चित्र दिसत आहे. एकट्या दक्षिण मुंबईत लोकसभा मतदार संघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघात केवळ दोन मतदार संघात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.तर चार मतदार संघात भाजप- शिवसेना युती आघाडीवर आहे.त्यामुळे पुढच्या चार महिन्यात येणाऱ्या विधानसभेतही काँग्रेस आघाडीची वाट अतिशय बिकट असल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण मुंबईतल्या वरळी, शिवडी,मलबार हिल आणि कुलाबा मतदार संघात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांच्या तुलनेत जवळ जवळ दुप्पट मते घेतली आहेत. तर केवळ भायखळा आणि मुंबादेवी मतदार संघात देवरा यांना आघाडी मिळाली आहे. भायखळा मतदार संघात सध्या एमआयएम चे वारीस पठाण आमदार आहेत.तर मुंबादेवी मतदार संघात काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत. यातच वंचित आघाडीने काँग्रेस आणी राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांवर आपला प्रभाव टाकल्याने आघाडीची डोकेदुखी वाढली असून आगामी विधानसभेतही त्याचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा लोकसभा मक्तदार संघात वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर अनिल कुमार यांनी 30348 मते घेतली असली तरी विधानसभेत याही मताला महत्व असणार आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातल्या विधानसभे मधील मते.....
विधानसभा महायुती काँग्रेस वंचित
वरळी 78653 42499 11584
शिवडी 91497 41645 5220
भायखळा 47627 76302 5352
मलबार हिल 99269 40700 1425
मुंबादेवी। 38969 73833 1989
कुलाबा 64515 46378 4643Body:.....Conclusion: