मुंबई - मालाड पश्चिमेकडील राठोडी व्हिलेज परिसरात एका घराची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सकाळपासून सुरू असणाऱ्या पावसात आज राठोडी व्हिलेजच्या बोर्गेस हाऊस भोवती असलेली भिंत कोसळली. कोसळलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम विटांचे होते.
या घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दल आणि पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पावसामुळे सोमवारी मालाड पिंपरी पाडा येथील पालिकेच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला होता.