मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते, अशा भागातील एक दिवसाआड 50 टक्के दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंद माता ही मुंबईतील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. कोरोनामुळे या बाजारपेठांवरही मोठा परिणाम झाला आहे. लग्नसराईचा काळ असतानाही या बाजारपेठेतील दुकानदारांवर ग्राहक नसल्यामुळे आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी केल्या सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, ठाणे मनपा आयुक्तपदी विजय सिंघल