ETV Bharat / state

कंपन्यांना आता 'सीएसआर'द्वारे करता येणार राज्य सरकारला मदत; मुख्यमंत्र्यांनी उचलले 'हे' पाऊल.. - मुख्यमंत्री आवाहन

राज्यावर कोरोनाचं संकट आले असताना राज्य सरकारला उद्योगपतींकडून सीएसआर अंतर्गत पैसा घेता येत नव्हता. त्यामुळे उद्योगपती पीएम केअर फंड मध्ये पैसे देत होते. त्यामुळे आता राज्य शासनाने "महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण" या नावाने स्वतंत्र बॅंक खाते उघडले असून उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत सामाजिक दायित्व निधीमधून (सीएसआर) उदारपणे योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Companies can donate their CSR money directly to Maharashtra government with this bank account
कंपन्यांना आता 'सीएसआर'द्वारे करता येणार राज्य सरकारला मदत; मुख्यमंत्र्यांनी उचलले 'हे' पाऊल..
author img

By

Published : Apr 22, 2020, 1:08 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना पाठबळ म्हणून निधी उभारण्यात येत आहे. यासाठी आता शासनाने "महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण" या नावाने स्वतंत्र बॅंक खाते उघडले असून उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत सामाजिक दायित्व निधीमधून (सीएसआर) उदारपणे योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

साथीच्या रोगाच्या समस्येने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्र शासनास मदत देण्यासाठी उस्फूर्त आणि असंख्य विनंत्या प्राप्त होत आहेत. या विनंतीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण" या नावाने स्वतंत्र बॅंक खाते स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कुलाबा, मुंबई येथे उघडले आहे. आपत्तीचा सामना समर्थपणे करण्यासाठी हा निधी राज्यास निश्चितपणे उपयुक्त ठरेल.

राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे 'एसडीआरएफ'चे स्वतंत्र खाते आज राज्यसरकारने निर्माण केले आहे. राज्यावर कुठलीही आपत्ती आली तर या खात्यात केंद्र सरकारचे एनडीआरएफचा विभाग पैसे टाकत असतो. तसंच या खात्यामध्ये उद्योगपतींनी दिलेला निधी सीएसआर म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. वास्तविक केंद्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून निधी घेताना राज्य सरकारला हे खाते आवश्यक असते.

फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला होता, तेव्हा हे खाते न उघडता कंपन्यांना परस्पर ओल्या दुष्काळात काम करण्याच्या सूचना फडणवीस सरकारने दिल्या होत्या. त्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारने देखील याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता राज्यावर कोरोनाचे संकट आले असताना राज्य सरकारला उद्योगपतींकडून सीएसआर अंतर्गत पैसा घेता येत नव्हता. तेव्हा त्यांनी हे खाते उघडले आहे. या खात्यामध्ये जमा करण्यात येणारा निधी कंपनी अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार 'सीएसआर'साठी पात्र आहे.

बँक खात्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

खात्याचे नाव :- महाराष्ट स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी
बँक खाते क्रमांक :- 39265578866
बँकेचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, वुड हाऊस रोड, कुलाबा, मुंबई .
ब्रँच कोड :- 572
आयएफएससी (IFSC) :- SBIN0000572
एमआयसीआर (MICR):- 400002087

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.