ETV Bharat / state

नोव्हेंबरपासून महाविद्यालय सुरू; काय म्हणतात, विद्यार्थी आणि प्राचार्य ? - University Grants Commission

सर्व महाविद्यालये आणि त्यांच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात ही १ नोव्हेंबरपासून केली जावी, यासाठीच्या नवीन मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकत्याच जारी केल्या आहेत.

College starts from November
नोव्हेंबरपासून महाविद्यालय सुरू
author img

By

Published : Oct 11, 2020, 1:17 PM IST

Updated : Oct 12, 2020, 2:54 PM IST

मुंबई- सर्व महाविद्यालये आणि त्यांच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात १ नोव्हेंबरपासून करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी केल्या आहेत. मात्र राज्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने ही महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. मात्र तरी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांची ऑनलाइन, व्हर्च्युअल पद्धतीने शिक्षण सुरू राहिले पाहिजे, असे मत विद्यार्थ्यांसोबतच काही प्राचार्यांनी व्यक्त केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सर्व महाविद्यालये आणि त्यांच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात ही १ नोव्हेंबरपासून केली जावी, यासाठीच्या नवीन मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकत्याच जारी केल्या आहेत. त्यासाठी याच पार्श्‍वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल राज्यातील कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव याची एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन यूजीसीच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी तातडीने करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षेवर सुरुवातीला मंत्री सामंत यांनी अशीच भूमिका घेतली होती मात्र त्यानंतर ही यूजीसीने आपले आडमुठी भूमिका कायम ठेवल्यामुळे शेवटी राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागत आहेत. यामुळे १ नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयावर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये यूजीसी विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर काही विद्यार्थी संघटनांनी यूजीसीचे समर्थनही केले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या भूमिकेच्या वेगळी भूमिका प्राचार्यांची नाही, असे मत प्राचार्य तुकाराम शिवारे यांनी व्यक्त केले. कोरोना आणि त्याची परिस्थिती लक्षात घेता कोणतेही महाविद्यालय सुरू होणे कठीण आहे. यूजीसीने गाइडलाइन दिल्या असल्या तरी, मुंबईत असलेली परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. तरीसुद्धा, महाविद्यालये सध्या सुरू होणार नाहीत, अशी भूमिका मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे, त्याला आमच्या प्राचार्य असोसिएशनचा पाठिंबा असल्याचे प्राचार्य शिवारे यांनी सांगितले.‍

मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. संजय बोकाडे म्हणाले की, युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना या योग्य आहेत. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे ऑनलाईन शिक्षण या काळात सुरू राहिले पाहिजे. त्यामुळे नोव्हेंबरपासून ऑनलाईनपद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यास काहीही हरकत नाही. अभियांत्रिकीच्या शिक्षणात प्रत्यक्ष प्रॅक्टीकलचा भाग महत्वाचा असतो, मात्र त्यालाही तुर्तासा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा पर्याय देता येऊ शकतो. यामुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईपर्यत महाविद्यालये, त्यांचे शिक्षण ऑनलाईन सुरू ठेवायला हरकत नसल्याचे डॉ. बोकाडे म्हणाले.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे अमोल हिरे या विद्यार्थ्यांनी सांगितले की, नोव्हेंबर पासून महाविद्यालय सुरू झाली तर कोरोनाचा प्रचंड मोठा धोका उद्भवू शकतो. यामुळे राज्यात आणि देशात पूर्ण जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही, तोपर्यंत केंद्र आणि युजीसीनेही महाराष्ट्रावर महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय नये, आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्यही त्यांनी लक्षात घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. विधी शाखेचे पदव्युत्तर ॲड. शोमितकुमार साळुंखे म्हणाले की, युजीसीने महाविद्यालये सुरू करण्यासाठी जाहीर केलेला निर्णय हा घाईगडबडीत घेतल्याचे दिसते. कोरोनाचा कहर असताना महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, असे युजीसीच नव्हे तर कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण या दोन्हीमध्ये मेळ घडवून आणला पाहिजे.

Last Updated : Oct 12, 2020, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.