ETV Bharat / state

कोल्डमिक्सनेच चांगल्या प्रकारे खड्डे बुजविले जातात; वादग्रस्त कोल्डमिक्सला महापौरांचे प्रमाणपत्र

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल ठरल्याचा आरोप गेल्या वर्षी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केला होता. मात्र, कोल्डमिक्स तंत्रज्ञान चांगले आहे, कोल्डमिक्सद्वारे चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवले जातात.

मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jun 18, 2019, 9:51 PM IST

मुंबई - पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल ठरल्याचा आरोप गेल्या वर्षी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केला होता. मात्र, कोल्डमिक्स तंत्रज्ञान चांगले आहे, कोल्डमिक्सद्वारे चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवले जातात. तसेच या तंत्रज्ञानाने मुंबईमधील खड्डे चांगल्या प्रकारे बुजवले जातील, असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

पालिकेच्या धोरणांवर नेत्यांनी मते मांडली

मुंबईत दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. पावसात मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण होते. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून गेल्या काही वर्षात अनेक तंत्रज्ञान वापरण्यात आली. सर्व तंत्रज्ञान फेल झाल्याने दोन वर्षांपूर्वी कोल्डमिस्क हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात करण्यात आली. पालिकेने गेल्यावर्षी कोल्डमिक्स वरळी येथील प्लान्टमध्ये बनवले. मात्र, त्यामुळे खड्डे बुजवले गेले नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. कोल्डमिक्स तंत्रज्ञान रद्द करून हॉटमिक्स तंत्रज्ञानाने खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली होती. त्यानंतर याहीवर्षी पालिका प्रशासनाने वादग्रस्त कोल्डमिक्स तंत्रज्ञान पद्धतीने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यावर्षी 1200 टन कोल्डमिक्स बनवण्यात येणार असून 1150 मेट्रिक टन माल तयार झाला आहे. यातील 24 वॉर्डात 930 मेट्रिक टनचे वाटपही करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता, गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात कोल्डमिक्स वापरले होते. त्याचा चांगला परिणाम पाहून यावर्षीसुद्धा वरळीच्या प्लांटमध्ये प्रशासनाने बनविलेले कोल्डमिक्स वापरणार आहोत. कोल्डमिक्स पावसाळ्यात वापरण्यात येते, ते चांगल्या प्रकारचे असल्याने खड्डे पडणार नाहीत असा दावा महापौरांनी केला आहे. गेल्यावर्षी ज्या ठिकाणी खड्डे पडले त्याठिकाणी कमी प्रमाणात कोल्डमिक्स वापरण्यात आले होते. ज्या ठिकाणी कोल्डमिक्स टाकले त्याठिकाणी खड्डे पडलेले नाहीत. इतर ठिकाणी खड्डे पडल्याने पुन्हा खड्डे पडल्याचा गैरसमज झाला. कोल्डमिक्स हे चांगले तंत्रज्ञान आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवले जातील असे महापौरांनी म्हटले आहे. तर कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल ठरले आहे. कोल्डमिक्स बंद करायला हवे. पालिका कोल्डमिक्सने खड्डे बुजवत असताना कंत्राटदार मात्र हॉटमिक्सने खड्डे बुजवत आहेत. यावरून खड्डे बुवण्याच्या तंत्रज्ञानात तफावत असल्याचे दिसत आहे असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.

Intro:मुंबई
पावसाळयात मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल ठरल्याचा आरोप गेल्या वर्षी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केला आहे. मात्र कोल्डमिक्स तंत्रज्ञान चांगले आहे, कोल्डमिक्सद्वारे चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवले जातात असे प्रमाणपत्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी देत या तंत्रज्ञानाने मुंबईमधील खड्डे चांगल्या प्रकारे बुजवले जातील असा दावा केला आहे. Body:मुंबईत मुसळधार पाऊस पडतो. पावसात मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण होते. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून गेल्या काही वर्षात अनेक तंत्रज्ञान वापरण्यात आली. सर्व तंत्रज्ञान फेल झाल्याने दोन वर्षांपूर्वी कोल्डमिस्क हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात करण्यात आली. गेल्यावर्षी पालिकेने कोल्डमिक्स आपल्या वरळी येथील प्लान्टमध्ये बनवले. मात्र त्यामुळे खड्डे बुजवले गेले नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. कोल्डमिक्स तंत्रज्ञान रद्द करून हॉटमिक्स तंत्रज्ञानाने खड्डे बुजवावेत अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली होती. त्यानंतरही याहीवर्षी पालिका प्रशासनाने वादग्रस्त हॉटमिक्स तंत्रज्ञान पद्धतीने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यावर्षी १२०० टन कोल्डमिक्स बनवण्यात येणार असून ११५० मेट्रिक टन माल तयार झाला आहे. यातील २४ वॉर्डात ९३० मेट्रिक टनचे वाटपही करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता, गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात कोल्डमिक्स वापरले होते. त्याचा चांगला परिणाम पाहून यावर्षीसुद्धा वरळीच्या प्लांटमध्ये प्रशासनाने बनविलेले कोल्डमिक्स वापरणार आहोत. कोल्डमिक्स पावसाळ्यात वापरण्यात येते, ते चांगल्या प्रकारचे असल्याने खड्डे पडणार नाहीत असा दावा महापौरांनी केला आहे. गेल्यावर्षी ज्या ठिकाणी खड्डे पडले त्याठिकाणी कमी प्रमाणात कोल्डमिक्स वापरण्यात आले होते. ज्या ठिकाणी कोल्डमिक्स टाकले त्याठिकाणी खड्डे पडलेले नाहीत. इतर ठिकाणी खड्डे पडल्याने पुन्हा खड्डे पडल्याचा गैरसमज झाला. कोल्डमिक्स हे चांगले तंत्रज्ञान आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवले जातील असे महापौरांनी म्हटले आहे. तर कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल ठरले आहे. कोल्डमिक्स बंद करायला हवे. पालिका कोल्डमिक्सने खड्डे बुजवत असताना कंत्राटदार मात्र हॉटमिक्सने खड्डे बुजवत आहेत. यावरून खड्डे बुवण्याच्या तंत्रज्ञानात तफावत असल्याचे दिसत आहे असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्ष नेते आणि महापौरांची बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.