मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रियदर्शनी येथील कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी केलीय. "रस्त्याचा पहिला टप्पा 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. याचा प्रवाशांना फायदा होईल, सर्व अत्याधुनिक तंत्र वापरून रस्ते बनवले जात आहे. हा रस्ता वापरण्यासाठी प्रवाशांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही, फेज-2 मे पर्यंत पूर्ण होईल," असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. ते कोस्टल रोड प्रकल्पाच्या पाहणीनंतर माध्यमांशी बोलत होते.
वाहतूककोंडीतून मुंबईकरांची सुटका : कोस्टल रोड प्रकल्पामुळं वाहतूककोंडीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारीअखेर पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यावेळी मुंबई महापालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बाल चहल हेही उपस्थित होते. मुंबईच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं 83 टक्के काम पूर्ण झालं आहे. कोस्टल रोड जानेवारीत खुला केला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
-
संपूर्ण स्वच्छता अभियान
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 7, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🗓️07-01-2024📍शिवडी-न्हावाशेवा सी लिंक (अटल सेतू), मुंबई https://t.co/uJ3XeuSU21
">संपूर्ण स्वच्छता अभियान
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 7, 2024
🗓️07-01-2024📍शिवडी-न्हावाशेवा सी लिंक (अटल सेतू), मुंबई https://t.co/uJ3XeuSU21संपूर्ण स्वच्छता अभियान
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 7, 2024
🗓️07-01-2024📍शिवडी-न्हावाशेवा सी लिंक (अटल सेतू), मुंबई https://t.co/uJ3XeuSU21
बोगद्याचं काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण : मरीन ड्राईव्ह ते वरळी सी -फेस या कोस्टल रोड बोगद्याचं काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळं लवकरच त्याचं उद्घाटन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दुसऱ्या बोगद्याचं काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडीही दूर होणार आहे, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय.
MTHL 12 जानेवारीला सुरू : कोस्टल रोड 31 जानेवारीला सुरू होईल. मुंबई ट्रांस हार्बर लिंक (MTHL) 12 जानेवारीला सुरू होईल. त्यामुळं रायगड जिल्ह्यात 12 मिनिटांत पोहोचता येईल. हे सर्व विकास प्रकल्प आहेत. कोस्टल रोड वांद्रे, वर्सोवा ते विरार ते वरळीपर्यंत न थांबता पोहोचता येईल. ही सर्व रखडलेली कामे होती, पूर्वीच्या लोकांनी ही कामे बंद पाडली होती. गतिमानपणे काम करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -