ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर - मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा बातमी

पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 19, 2020, 4:59 PM IST

मुंबई - अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री बुधवारी ( २१ ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील.

उद्धव ठाकरे हे 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर विमानतळावर येतील. त्यानंतर सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव व अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. नंतर दुपारी 1.45 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा दिवसभर होती. मात्र हा दौरा बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे सोमवारी सोलापूर व बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा - टीआरपी घोटाळा : अर्णबच्या याचिकेवर पुढील सुनावणी 5 नोव्हेंबरला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.