मुंबई - महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य आपण करता कामा नये. मराठा समाजासह इतर सर्व समाजांना मी न्याय देणारच, ज्याच्या-त्याच्या वाट्याचे सर्वांना मिळेल. पण, जातीपातीच्या कारस्थानांना बळी पडू नका, असे आवाहन आजच्या दसरा मेळाव्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यंदाचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे कुटुंबीय, भाजप नेते, राज्यपाल यांच्यावर जोरदार टीका केली. सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय? पक्षावर लक्ष द्या पण थोडे लक्ष देशावरही द्या. देश रसातळाला चालला आहे. देश कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा पंतप्रधान मोदींचा अपमान आहे. संपूर्ण देशात फार विचित्र परिस्थिती सुरू आहे. आर्थिक घडी नीट बसवण्याऐवजी ते इतरांचे सरकार पाडण्यात मग्न आहेत.
हिंदू म्हणजे काय हे तुमच्या सरसंघचालकांकडून शिकून घ्या. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणणारी शिवसेना तुम्हाला नको आहे. मोहन भागवतांना राष्ट्रपती करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्ववाद शिकवणारे संघमुक्त भारताची घोषणा करणऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे घालत आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे -
- महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असे कोणतेही कृत्य आपण करता कामा नये.
- मराठ्यांसह सर्व समाजांना मी न्याय देणारच, ज्याच्या त्याच्या वाट्याचे सर्वांना मिळेल. पण, जातीपातीच्या कारस्थानांना बळी पडू नका.
- बिहारच्या जनतेने डोळे उघडे ठेवून मतदान करावे.
- माझे सरकार पाडण्याऐवजी तुमचे सरकार नीट चालवा.
- एनडीए आता फुटत चालली आहे याचे त्यांनी भान राखावे
- टाळेबंदी करण्याची मला हौस नाही, हळुहळु सर्व काही खुले होतच आहे.
- संपूर्ण देशात फार विचित्र परिस्थिती सुरू आहे. आर्थिक घडी नीट बसवण्याऐवजी ते इतरांचे सरकार पाडण्यात मग्न आहेत.
- एकही नवा रुपया न खर्च करता तेथे मुंबई मेट्रो कारशेड होईल
- भाजपने किमान या मातीशी तरी इमान ठेवावा, शहरात जंगल राखण्याचे काम महाविकास आघाडीने केले.
- शिवसेना मुंबईचा लचका कोणाला तोडू देणार नाही, आम्ही शांत आहोत, षंड नाहीत
- गोमूत्र, शेण खाऊन आमच्यावर ओकू नका, ते तुम्हीच खाऊन ढेकर द्या.
- बिहार पुत्राची आत्महत्या होते, म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रांवर टीका करता.
- मुंबई पाकव्याप्त काश्मीर होत असेल तर ते पंतप्रधानांचे अपयश म्हणावे लागेल
- गांजाची शेती तुमच्याकडे असेल, पोलिसांची मानहानी सहन केली जाणार नाही, जिवंत दहशतवाद्यांना पकडण्याचे धाडस त्यांनीच केले.
- महाराष्ट्र कोरोनाच्या काळातही उद्योगधंद्यांमध्ये आघाडीवर आहे
- महाराष्ट्राची वारंवार बदनामी करण्यात येत आहे.
- घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मंबईशी नमकहरामी करायची, उद्धव यांचा कंगनाला टोला
- आमचा बाप आमच्यासोबत तुमच्यासारखे भाडोत्री बाप नाहीत, दानवेंना टोला
- बिहारला फक्त मोफत लस, उर्वरित भारत काय कझाकिस्तान आहे का?
- देश संघमुक्त करू असे म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या पाठीशी आता भाजप उभा आहे
- मोहन भागवतांना राष्ट्रपती करा म्हणणारी शिवसेना तुम्हाला नको झाली.
- आम्ही मित्राला कधीही दगा दिला नाही.
- बिहारमध्ये नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार असे भाजप सांगते, मात्र ऐनवेळी ते बदलतात.
- इंग्रजांप्रमाणे मस्ती भाजप पक्षाला चढली आहे.
- जीएसटीची करप्रणाली फसलेली दिसते, पंतप्रधानांनी प्रामाणिकपणे माफी मागून अगोदरची करप्रणाली सुरू ठेवावी
- पक्षाबरोबरच देशाच्या उन्नतीवरही लक्ष द्या, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे आणायचे कुठून? केंद्राकडून ३८ हजार कोटी येणे बाकी
- कोरोनाच्या काळातही सरकार पाडण्याचा यांच्या डोक्यात विचार सुरू
- हिंदू म्हणजे काय हे तुमच्या सरसंघचालकांकडून शिकून घ्या
- गोवंश हत्याबंदीचा कायदा गोव्यात का नाही?
- घंटा बडवा, थाळ्या वाजवा हे त्यांचे हिंदुत्व
- मंदिरावरून आमच्यावर टीका होते, आमच्या हिंदुत्वावर प्रश्न विचारले जातात.
- ज्याला कोणाला आम्हाला टक्कर द्यायची त्यांनी देऊन पाहावी
- हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणणारी शिवसेना नको, मोहन भागवतांना राष्ट्रपती करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला हिदुत्ववाद शिकवणारे संघमुक्त भारताची घोषणा करणऱ्या नितीशकुमाराच्या गळ्यात गळे घालत आहेत.
- सरसंघचालकांचे आजचे भाषण उद्याच्या सामनामध्ये व्यवस्थित छापा. उद्धव ठाकरेंची संजय राऊतांना सुचना
- आम्हाला हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. मात्र आता प्रश्न विचारणारे बाबरी विध्वंसावेळी बिळात लपवून बसले होते.
- कुणालाही टार्गेट करायला शिवसेनाचा दसरा मेळावा टारगट मेळावा नाही. पण काही लोकांचा समाचार घेणे आवश्यक आहे.
- आम्ही गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाही, पण जर आमच्या वाटेला जाल तर मुंगळा कसा ढसतो ते दाखवू
- हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवावे