ETV Bharat / state

खुशखबर..! कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी होणार जाहीर

author img

By

Published : Feb 23, 2020, 7:41 PM IST

Updated : Feb 23, 2020, 10:01 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

CM Uddhav thackeray Press in mumbai
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई - आमचं सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर योजनांची अंमलबजावणी करणारे असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच कर्जमाफीची पहिली यादी उद्या (सोमवार) जाहीर करणार आहे. प्रथम जिल्ह्यातील २ गावांची ही यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच महिला अत्याचाराबाबत आमचे सरकार हे संवेदनशील असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. कर्जमाफीची प्रक्रिया ही ३ महिन्यात म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

खुशखबर..! कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी होणार जाहीर

एल्गार परिषदेचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही

एल्गार परिषदेचा तपास मी केंद्र सरकारकडे दिलेला नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मात्र, त्याबाबत मी नाराज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सीएए आणि एनआरसीबद्दल माझी भूमिका स्पष्ट असल्याचे ठाकरे म्हणाले. मात्र, एनआरपी बद्दल आम्ही जबाबदार मंत्र्यांची समिती नेमून चर्चा करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

राज्यात लवकरत आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार अभ्यास करुन लवकरच आंध्र प्रदेशच्या धर्तीवर नवीन कायदा करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. लवकरच हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचे देशमुख म्हणाले.

भाजपने काय सावरकरांचा मक्ता घेतलाय काय?

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावला. सावरकरांचा भाजपने काय मक्ता घेतलाय का? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणेल तेच हिंदूत्व काय? असेही ते म्हणाले. तसेच त्यांचे हिंदूत्व आपण मानत नसल्याचे ठाकरे म्हणाले.

राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांची यादी आमच्याकडे आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. आम्ही मागील सरकारकडे कर्ज माफीच्या शेतकऱ्यांची यादी मागत होतो. परंतू, आम्हाला त्यांनी दिली नसल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. मागच्या सरकारने अगोदर आकडेवारी जाहीर केली आणि नंतर ते कामाला लागले. आम्ही आता माहिती अगोदर घेतली आहे. ज्यांना ही कर्जमाफी आम्ही देणार आहोत, त्या शेतकऱ्यांचे खाते आणि त्यांची माहिती ही संगणीकृत करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीला जाहीर करणाऱ्या पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यातील २ गावे प्रमाणे २० हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षाने आज सरकारकडून तूर खरेदी आणि भात खरेदीच्या संदर्भात सत्ताधारी पक्षावर आरोप केले होते. त्यांचा पवारांनी समाचार घेतला. विरोधक हे तूर खरेदीसाठी गैरसमज पसरवत आहे. पहिल्यापासून हेक्टरी तूर खरेदी केली जाते. आतापर्यंत ३०६ केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. ६८ हजार ६९० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तूर खरेदीसाठी काही अडचणी आल्या तर, पुढे काही निर्णय घेऊ असे पवार म्हणाले. भात खरेदीसाठी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, त्यांनी पुरावा दिला तर, त्याची आम्ही चौकशी करू असेही पवार यांनी जाहीर केले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांचे खंडण केले. त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी मांडाव्यात, त्यांनी सांगाव्यात, मात्र सरकार काही करत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही जे काही चांगले निर्णय घेतले त्यातून सर्व घटकातील लोकांना आधार मिळाला आहे. सरकार स्थिरावले आहे. काम करत आहे. म्हणून, विरोधी पक्षाला पचनी पडले नसल्याचे ठाकरे म्हणाले. आपण काही करायचे नाही पण आम्ही काही केले ते पहायचे नाही ही त्यांची पोटदुखी असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. तसेच शिवभोजनापासून ५ दिवसांचा आठवडा आदी अनेक निर्णय लोकांच्या हिताचे घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गिरणी कामगारांची पहिली लॉटरी १ मार्च रोजी काढली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. केंद्राने एल्गार परिषदेचा तपास ज्या प्रकारे आपल्याकडे घेतला त्यावर माझी नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एनपीआरमध्ये ज्या अडचणीचे विषय आहेत. ते आम्ही तपासणार आहोत. त्यासाठी आम्ही तिन्ही पक्षाची समिती नेमणार आहोत. तर सीएए (CAA) संदर्भात मी माझ्या मुलाखतीत स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्यात कुठेही CAA साठी दंगे झाले झाले नाहीत. परंतू, भाजपशासित सरकार आहे, तिथे दंगे होत आहेत. जेएनयुमध्ये ज्या प्रकारे अतिरेकी घुसवले होते, त्यांना अजूनही अटक केल्याचे मी वाचलं नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. तसेच मराठा समाजासाठी सरकार ताकदीने लढत आहे, आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Feb 23, 2020, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.