मुंबई - राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्याची कर्तबगारी दाखविली. त्या नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मूर्ती होत्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी अभिवादन केले आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजाऊंनी 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचड या गावी शेवटचा श्वास घेतला होता.
मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य आणि लोककल्याणकारी राज्य स्थापनेची प्रेरणा राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्याकडून मिळाली. त्या मातृत्वाची मूर्ती होत्या, पण तितक्याच करारी आणि कर्तृत्वान होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना शौर्य, धैर्य आणि नेतृत्व गुणांचे धडे दिले. यामुळेच परकियांच्या जुलमी राजवटी उलथल्या गेल्या. रयतेतील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण त्यांनी दिली. स्वराज्यात धर्मा इतकाच त्यांचा स्री रक्षण-सक्षमीकरणाबाबत कटाक्ष होता. त्यांच्या नजरेतील स्वराज्य व सुराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहू या. हेच विश्ववंद्य जिजाऊ माँ साहेब यांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि त्यांना मानाचा मुजरा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
जिजाऊ माँ साहेबांच्या नजरेतील सुराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे जिजाऊंच्या स्मृतिदिनी अभिवादन
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्याची कर्तबगारी दाखविली. त्या नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मूर्ती होत्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी अभिवादन केले आहे.