ETV Bharat / state

Costal Road Tunnel Mining : कोस्टल रोड बोगदा खणन कामाचा 'ब्रेक थ्रू'; मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा प्रकल्प - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोस्टल रोड बोगदा खणन कार्यक्रम

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या 'मावळा' ह्या टिबीएम संयंत्राच्या ( TBM plant Mawla ) सहाय्याने आज पूर्ण झाले. यावेळी मुंबईत दळणवळणाची साधने कमी पडू लागली आहेत. कोस्टल रोड प्रकल्प ( Coastal Road Project ) यावर पर्याय असून मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा ठरेल, असा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray on Coastal Road Project ) यांनी व्यक्त केला.

Costal Road Tunnel Mining Program
कोस्टल रोड बोगदा खणन कार्यक्रम
author img

By

Published : Jan 10, 2022, 5:27 PM IST

मुंबई - मुंबईत दळणवळणाची साधने कमी पडू लागली आहेत. कोस्टल रोड प्रकल्प ( Coastal Road Project ) यावर पर्याय असून मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा ठरेल, असा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray on Coastal Road Project ) यांनी व्यक्त केला. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या 'मावळा' ह्या टिबीएम संयंत्राच्या ( TBM plant 'Mawla ) सहाय्याने आज पूर्ण झाले.

या कामाचा 'ब्रेक थ्रू' गिरगाव चौपाटी येथे पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, ( Minister Aditya Thackeray ) महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह पालिकेचे नगरसेवक, पालिकेचे अधिकारी ही दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Priyadarshini Park to Girgaon Chowpati mining program
कोस्टल रोड बोगदा खणन

शाब्बास मावळा -

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी या पहिल्या २.०७० किमी लांबीच्या पहिल्या बोगद्याचे काम मावळा या टीबीएमद्वारे पूर्ण झाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत शाब्बास, मावळा.! उत्तम काम करत असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. मावळा या शब्दाला साजेसे काम यंत्र आणि ते यंत्र हाताळणारे सहकारी करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्वप्न प्रत्यक्षात आणणे कठीण असते. मुंबईकरांचे हे स्वप्नं पुर्ण करण्याच्या ध्यासाने काम करणाऱ्या टीमचा मला अभिमान आहे. या मावळ्याच्या कामाचा शुभारंभ केलेला दिवस आठवतो. तेव्हा आपण कामाचा टप्पा कधी आणि कोणत्या काळात पूर्ण करू हे सांगितले होते. तो क्षण आज पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मेहनत, चिकाटी, जिद्दीचे यश -

कोरोना संसर्ग वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे कोस्टल रोड कामाचा वेग काहीसा मंदावला होता. तरीही ऊन, वारा पावसाचा मुकाबला करत, प्रकल्प काम वेगाने पूर्ण केला आहे. हा प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा आहे. मुंबईच्या वाहतूकीला गती देणारा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. कोस्टल रोड मार्गी लावून मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीतून निश्चित कालावधी आधी प्रकल्प मार्गी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Gas Leak At Kurla : कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गॅस लिकेज होऊन एकाचा मृत्यू, दोन जखमी

आव्हानात्मक काम -

दोन टोक समुद्राखालून जोडायचे हे काम आव्हानात्मक होते. हे काम आपण शक्य करून दाखवले आहे. १९९५ साली मुंबईत युती शासनाने ५५ उड्डाणपूल बांधले होते. सध्या दळणवळणाच्या साधनासाठी ते कमी पडत आहेत. आता कोस्टल रोडचे स्वप्न पाहिले. आपण केवळ रस्त्याचे काम करत नाही तर आसपासच्या भागात सुशोभिकरण देखील करत आहोत. नियोजित वेळेत सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्य शासन आवश्यक असलेले सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

मावळ्याने कठीण काम पार केले -

आज अतिशय आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे. कठीण काम मावळ्याने पार केले. पहिले टनेल या निमित्ताने पूर्ण झाले आहे, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच इज ऑफ लिवींगवर फोकस करून मुंबई उपनगरात विविध कामे सुरू आहेत. मुंबईला पुढे नेण्याची ताकत या कामांमध्ये आहे. महापालिका कर्मचारी वर्गाचे, ऑन ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या टीमचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करणार -

सुखाचा प्रवास, मोकळा श्वास हे या प्रकल्पाचे ब्रीद आहे. एक वर्षात बोगदा पूर्ण केला आहे. ११ जानेवारी २०२१ रोजी कामास प्रारंभ केला होता. हा एकप्रकारे विक्रम आहे. नियोजित तारखेपर्यंत हा बोगदा पूर्ण होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.