ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंनी बोलावली मुंबई पालिकेची बैठक; कोरोना परिस्थिती, मान्सूनपूर्व तयारीवर चर्चा

author img

By

Published : Apr 16, 2021, 3:43 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्यासोबत आज सांयकाळी 4 वाजता आढावा बैठक बोलावली आहे. यावेळी कोरोना परिस्थिती आणि मान्सूनपूर्व तयारी संबंधी चर्चा केली जाणार आहे.

Mumbai
Mumbai

मुंबई - राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. रोज धडकी भरवणारे रुग्णवाढीचे आकडे समोर येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. परंतु, लोकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्यासोबत आज (16 एप्रिल) सांयकाळी 4 वाजता आढावा बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक होणार आहे. दरम्यान, कोविड परिस्थिती आणि मान्सूनपूर्व तयारीच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत प्रतिदिन सुमारे 8 ते 11 हजार रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येप्रमाणेच कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व सेवा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र, मुंबईत दोन दिवस संचारबंदीचे उल्लघंन सुरु आहे. मोठ्या प्रमाणात खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु आहे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लागू केलेल्या संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणीच्या हालचाली राज्य शासनाने आता सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका प्रशासनासोबत आढावा बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक होणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, २४ प्रभागातील सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी तसेच विविध खात्यातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मान्सूनपूर्व कामांचा आढावाही यावेळी घेण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.