ETV Bharat / state

'लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश हे मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश' - लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी

मुख्यमंत्री पद हे फक्त एक निमित्त आहे. माझ्या हातून महाराष्ट्राची सेवा घडत आहे, हे महत्त्वाचे आहे. लोकप्रियतेमध्ये माझा वरचा क्रमांक येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय्य आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

popular cm uddhav thackeray  uddhav thackeray on cm popularity  popular cm list  uddhav thackeray 5th rank  उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री  लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी  लोकप्रियतेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 5, 2020, 1:43 PM IST

मुंबई - लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला. याबाबत त्यांनी महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री पद हे फक्त एक निमित्त आहे. माझ्या हातून महाराष्ट्राची सेवा घडत आहे, हे महत्त्वाचे आहे. लोकप्रियतेमध्ये माझा वरचा क्रमांक येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय्य आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला. शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी यांचे आभार मानले.

या संस्थांनी केले सर्वेक्षण -

दरम्यान, आयएएनएस आणि सी व्होटर्सने वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले होते. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर ६६.२० टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली, तर २३.२१ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पसंत असल्याचे म्हटले आहे. याच सर्वेक्षणामध्ये देशातील मुख्यमंत्र्यासंदर्भातही काही प्रश्न विचारण्यात आले होते. याद्वारे राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ७६.५२ टक्के -

या सर्वेक्षणानुसार बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांना ८२.९६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ८१.०६ टक्के मते मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यासोबतच तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (८०.२८) यांचा समावेश आहे. चौथा क्रमांक व्हायएसआर काँग्रेसचे प्रमुख तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना मिळाला असून त्यांना ७८.५२ टक्के मते मिळाली आहेत, तर पाचव्या स्थानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून त्यांना ७६.५२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.