मुंबई - मुंबईला गतिमान करण्याच्या हेतूनं मुंबईत आज एमएमआरडीएच्या विविध विकास कामांचे उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईत मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो लाईनच्या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रो लाईन 2 अ आणि मेट्रो- 7 च्या ट्रायल रणला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर तसंच एम एमआर डीए कमिशनर आर ए राजीव देखील उपस्थित होते. यावेळी आयुक्त आर ए राजीव यांच्यासोबत बातचित देखील केली. यावेळी या मेट्रोमुळं वेस्टर्न लाईवर 10 ते 12 टक्के रेल्वेवरील ताण कमी होईल तर 25 टक्के वेस्टर्न हायवेवरील ट्राफिक कमी होण्याचा अंदाज असल्याचं आर ए राजीव यांनी सांगितलं. ही मेट्रो सेवा जानेवारी महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असा अंदाज राजीव यांनी बोलून दाखवला
मेट्रो 2 अ ठकळ वैशिष्ट्ये
या मार्गाचा कॉरिडोअर दहिसर पूर्व ते डीएन नगर असा असणार आहे. प्रकल्पाची लांबी 18.6 किलोमीटर असणार आहे. मेट्रो 2 अ या मार्गात 17 स्थानकं असणार आहे. यात अंधेरी पश्चिम, लोअर ओशिवारा, ओशिवारा, गोरेगाव, पहाडी गोरेगाव, लोअर मलाड, मालाड (पश्चिम), वलनाई, हडाणकरवाडी, कांदीवली (पश्चिम), पहाडीएकसर, बोरिवली (पश्चिम), एकसर, मंडपेश्वर, कंदरपाडा, अप्पर दहिसर आणि दहिसर पूर्व अशी स्टेशन असणार आहेत. तर या मार्गावर तीन ठिकाणी इंटरचेन्ज स्टेशन असणार आहे. तसंच प्रत्येक मेट्रो ट्रेनला सहा कोच असणार आहेत
मेट्रो 7 ची ठळक वैशिष्ट्ये
या मार्गाचा कॉरिडोर अंधेरी ते दहिसर असा असणार आहे. वेस्टर्न हायवेला समांतर असा हा मार्ग असणार आहे. या मार्गावर 13 स्टेशन असणार आहेत. या मार्गावर गुंडावली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व), आरे. दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा. तसंच प्रत्येक मेट्रो टेनला सहा कोच असणार आहेत
दोन्हीमेट्रोलाईनमुळं मुंबईमधल्या ट्राफिकच्या समस्येवर तोडगा निघणार आहे. तसंच वेस्टर्न हायवेवर होणारी वाहतूकीची कोंडी देखील सुटण्यास मदत होणार आहे. लोकलवरील ताण देखील कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मेट्रोची भाडे रचना
0-3 किलोमीटर साठी 10 रुपये भाडे
3-12 किलोमीटरसाठी 20 रुपये भाडे
12-18 किलोमीटरसाठी 30 रुपये भाडे
18-24 किलोमीटरसाठी 40 रुपये भाडे
24- 30 किलोमीटरसाठी 50 रुपये भाडे
30 -36 किलोमीटसाठी 60 रुपये भाडे
36- 42 किलोमीटर साठी 70 रुपये भाडे
मुंबई मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चाचणीला हिरवा झेंडा - मुंबई मेट्रो न्यूज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो लाईनच्या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रो लाईन 2 अ आणि मेट्रो- 7 च्या ट्रायल रणला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली.