ETV Bharat / state

'शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही' - Uddhav thackeray on hindu, Uddhav thackeray on flag

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानं शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे काही लोक म्हणत आहेत. मात्र, शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

cm Uddhav thackeray comment on Hindutav
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
author img

By

Published : Feb 9, 2020, 7:14 PM IST

Updated : Feb 9, 2020, 8:33 PM IST

मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानं शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे काही लोक म्हणत आहेत. मात्र, शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहात शिवसेनेच्या आमदार व जिल्हाप्रमुखांच्या बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा - 'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'

हेही वाचा - 'सीएए'मध्ये गैर काय, माझा देश म्हणजे धर्मशाळा नव्हे - राज ठाकरे

विशेष म्हणजे आजच्या बैठकीत सीएए आणि एनआरसी संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमकं काय आहे हे या बैठकीत समजावून सांगितले आहे. शिवसेना सत्तेत आहे, त्यामुळे शासनाच्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून हे काम करा, अशा सूचना देखील आमदारांना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात शिवसेना बळकट करणासाठी या सूचना देण्यात आल्या आहेत. जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालय समनव्यक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने जनतेच्या हितासाठी आरोग्यसेवा, शिवभोजन, कर्जमुक्तीसह अनेक योजना जाहीर केल्या आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचायला हव्यात. हे राज्य जनतेचे असून, त्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून हे काम करा आणि जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, आमदारांना दिल्या.

2 लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच योजना जाहीर करणार असून, कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी मार्चपासून सुरू होऊन एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. गरजू शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळायला हवा, यासाठी आमदारांनी स्वत: त्यांच्यांपर्यंत पोहोचायला हवे. यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश उद्धव ठाकरेंनी आमदार तसेच प्रशासनाला दिले.

ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न त्या त्या जिल्ह्यात, विभागात सुटावेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. याची मुख्य समन्वयकाची जबाबदारी आमदार रवींद्र वायकर यांना देण्यात आली. सामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयांच्या माध्यमातूनच सुटायला हवेत. त्यांना हे प्रश्न घेऊन मुंबईपर्यंत पायपीट करण्याची वेळ येता कामा नये, काळजी आमदार आणि प्रशासनाने घ्यायची आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Intro:
मुंबई - काही लोकं म्हणतायत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेस सोबत गेल्यानं आम्ही हिंदुत्व सोडलंय असं बोललं जातंय. पण शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सह्याद्री येथे शिवसेनेच्या आमदार व जिल्हाप्रमुखांच्या बोलावलेल्या बैठकीत आपली हिंदुत्ववादाची भूमिका स्पष्ट मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Body:आजच्या बैठकीत विशेष म्हणजे सीएए आणि एनआरसी संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमकं काय आहे हे या बैठकीत समजावून सांगितलं गेलं.
शिवसेना सत्तेत आहे, त्यामुळे शासनाच्या योजना जनमाणसापर्यंत पोहचल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून हे काम करा अशा सूचना देखील आमदारांना देण्यात आल्या. या सूचना शिवसेनेच्या ग्रामीण भागात बळकटीकरणासाठी देण्यात आल्या आहेत.
जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालय समनव्यक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, त्याबाबत सर्व आमदारांनी त्यांचं या बैठकीत स्वागत केलं.Conclusion:
Last Updated : Feb 9, 2020, 8:33 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.