ETV Bharat / state

राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयांत मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आणि मंत्रालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचे खेटे वाचवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्यात विभागीय मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

Cm secretariat desk started at every divisional commissioner office
राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयांत मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना
author img

By

Published : Jan 21, 2020, 1:00 AM IST

मुंबई- हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विभागीय पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' स्थापन करण्यात आले आहेत. अशी माहिती राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. शासकीय कामकाज लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान व्हावे हा या निर्णयामागील हेतू आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आणि मंत्रालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचे खेटे वाचवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्यात विभागीय मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. मात्र, शासनाच्या या उपक्रमामुळे खरच सर्वसामान्य जनतेला फायदा होईल का? यावर प्रशासनातील कोणीही बोलण्यास तयार नाही. मात्र, घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि कोकण असे सहा महसूल विभाग आहेत.

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात द्या अर्ज-

सर्वसामान्य जनतेला त्याचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले गाव, शहर सोडून मुंबईला यावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचावेत या हेतूने हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रिय पातळीवरचे प्रश्न त्याच स्तरावर सुटावेत, या प्रक्रियेला वेग मिळावा ही त्यामागची भूमिका आहे. आता सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांत मुख्यमंत्री सचिवालय कार्यालय झाल्याने जनतेला क्षेत्रीय स्तरावरचे प्रश्न घेऊन मुंबईला येण्याची आता गरज नाही. मुख्यमंत्री यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज, निवेदने आता या कक्षात स्वीकारले जाणार आहेत.

अर्जांवर काय कारवाई झाली याची ही माहिती मिळणार-

मुख्यमंत्री कार्यालयात आलेले अर्ज, निवेदने संबंधित क्षेत्रिय स्तरावरील यंत्रणेकडे कार्यवाहीसाठी त्वरित पाठवले जाणार आहेत. तसेच लोकशाही दिनाच्या दिवशी या अर्ज आणि निवेदनांवर नेमकी काय कार्यवाही झाली याचा ही आढावा घेण्यात येणार आहे.

विभागाचे महसूल उपायुक्त विशेष अधिकारी-

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विभागाचे महसूल उपायुक्त हे मुख्यमंत्री कार्यालयात पदसिद्ध विशेष अधिकारी म्हणून काम पाहतील. शिवाय एक नायब तहसीलदार, एक लिपिक आणि एक लिपिक टंकलेखक हेही या कक्षात काम करतील.

दर महिन्याच्या पाच तारखे आधी पोच पावतीची माहिती-

अर्ज, निवेदन घेऊन आलेल्या व्यक्तीने या कक्षात आपला अर्ज किंवा निवेदन सादर केल्यानंतर त्यांना पोचपावती देण्यात येईल. क्षेत्रियस्तरावर कार्यवाही अपेक्षित असलेले अर्ज विभागीय आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे त्वरित पाठवण्यात येतील. ज्या अर्जांवर शासनस्तरावर कार्यवाही अपेक्षित आहे, जे विषय धोरणात्मक बाबींशी संबंधित आहेत अशा महत्वाच्या प्रकरणांशी संबंधित असलेले अर्ज ‍किंवा निवेदने मुख्यमंत्री सचिवालयातील प्रधान सचिवांकडे सादर करण्यात येतील. क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेले अर्ज, त्यावर झालेली कार्यवाही, प्रलंबित अर्ज यांची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षात दर महिन्याच्या पाच तारखेपूर्वी सादर करण्यात येईल. या प्रकारे विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाच्या कामाची रूपरेखा आखण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Intro:विभागीय मुख्यमंत्री कार्यालये सुरू, मंत्रालयातले खेटे वाचणार ?

मुंबई 20

विभागीय मुख्यमंत्री कार्यालये झाल्याने राज्यातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईत मंत्रालयात येणाऱ्या ग्रामीण जनतेचे खेटे वाचण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्यात विभागीय मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. मात्र शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातून थेट राजधानी मुंबईत मारावे लागणारे खेटे थांबतील का? यावर प्रशासन बोलण्यास तयार नाही. प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष'  स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान घेतला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये  राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक , औरंगाबाद आणि कोकण असे सहा महसूल विभाग आहेत.

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात द्या अर्ज

सर्वसामान्य माणसाला त्याचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले गाव, शहर सोडून मुंबईला यावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचावेत या हेतूने हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रिय पातळीवरचे प्रश्न क्षेत्रीय स्तरावरच सुटावेत, या प्रक्रियेला वेग मिळावा ही त्यामागची भूमिका  आहे. आता  सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कार्यालय झाल्याने जनतेला क्षेत्रीय स्तरावरचे प्रश्न घेऊन मुंबईला येण्याची आता गरज नाही. मुख्यमंत्री यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज,निवेदने संदर्भ आता या विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्वीकारले जाणार आहेत.

अर्जांवर काय कारवाई झाली याची ही माहिती मिळणार.

मुख्यमंत्री कार्यालयात आलेले अर्ज, निवेदने संबंधित क्षेत्रिय स्तरावरील यंत्रणेकडे कार्यवाहीसाठी त्वरित पाठवले जाणार आहेत. तसेच लोकशाही दिनाच्या दिवशी या अर्ज आणि निवेदनांवर नेमकी काय कार्यवाही झाली याचा ही आढावा घेण्यात येणार आहे.

विभागाचे महसूल उपायुक्त विशेष अधिकारी

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विभागाचे महसूल उपायुक्त हे मुख्यमंत्री कार्यालयात पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहतील. शिवाय एक नायब तहसीलदार, एक लिपिक आणि एक लिपिक टंकलेखक हेही या कक्षात काम करतील.

दर महिन्याच्या पाच तारखे आधी पोच पावतीची माहिती.

अर्ज, निवेदन घेऊन आलेल्या व्यक्तीने या कार्यालयात आपला अर्ज किंवा निवेदन सादर केल्या नंतर, ज्या अर्जांवर शासनस्तरावर कार्यवाही अपेक्षित आहे, जे विषय धोरणात्मक बाबींशी संबंधित आहेत अशा महत्त्वाच्या प्रकरणांशी संबंधित असलेले अर्ज ‍किंवा निवेदने मुख्यमंत्री सचिवालयातील प्रधान सचिवांकडे सादर करण्यात येतील. क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेले अर्ज, त्यावर झालेली कार्यवाही, प्रलंबित अर्ज याची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षात दर महिन्याच्या ५ तारखेपूर्वी सादर करण्यात येईल. अश्या प्रकारे मुख्यमंत्री सचिवालय विभागीय कार्यालयाच्या कामाची रूपरेखा आखण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.