ETV Bharat / state

CM Relief Fund : आता केवळ एका मिस कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधी; 'हा' आहे नंबर

author img

By

Published : May 21, 2023, 8:33 PM IST

मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आता फक्त मिस कॉल देण्याची आवश्कता आहे. याआधी हा निधी मिळण्यासाठी किचकट आणि वेळकाढूपणा प्रक्रिया होती. त्यामुळे अनेक गरजू या सेवेपासून वंचित राहत होते. मात्र, आता फक्त एका मिस कॉलवर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी मिळणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येतात. ग्रामीण भागात अनेक समस्यांचा सामना अर्जदारांना करावा लागतो. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८६५०५६७५६७ हा मोबाइल क्रमांक देऊन केवळ मिसकॉलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी करिता वेळकाढू प्रक्रियेतून आता सहज, सोप्या आणि कमी वेळात निधी मिळेल. लाभार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

गरजूंना होणार फायदा - निरोगी आरोग्य, शारीरिक उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी शासनामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबवते. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात आदी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणाऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य दिले जाते. तसेच आर्थिक दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य पुरविले जाते. विविध दुर्धर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आजवर ८ हजार रुग्णांकरीता ६० कोटी ४८ लाख इतका मदतनिधी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वाटप करण्यात आला. प्रति महिना दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होतात, पैकी १ हजार अर्ज मंजूर होतात. अर्ज दाखल केल्यानंतर केवळ ७ दिवसांत वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते.

लवकरच अँप बनवणार - मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येणारे बहुतांश अर्ज अपूर्ण स्वरूपात असतात. मदत करण्यास अडचणी येतात. सध्या मिसकॉल वर ही सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी लवकरच मुख्यमंत्री सहायता निधी अर्जासाठी अॅप बनवले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि एकाच वेळी तिथे सर्व माहितीचे अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

अशी असेल प्रक्रिया - ग्रामीण भागातील गरजूंना निधीसाठी मंत्रालयाचे दरवाजे झिझवावे लागतात. अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागते. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, लक्षात घेऊन लाभार्थ्यांना थेट मिसकॉलवर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. अर्जदाराने ८६५०५६७५६७ या मोबाईल क्रमांकावर मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड होणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून पीडीएफमध्ये cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर अपलोड करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

कर्करोगावरील उपचारांसाठी सर्वाधिक अर्ज - मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कर्करोगावरील उपचाराच्या मदतीसाठी सर्वाधिक अर्ज येतात. एकूण अर्जांच्या एकूण २५ टक्के अर्ज असून त्या खालोखाल हृदयविकार, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, अपघात, डायलिसिस, किडनीविकार उपचारांच्या मदतीसाठी अर्ज येत आहेत. भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांकडून देखील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज येत आहेत.

हेही वाचा -

  1. BMC Election : 'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना ५० चा आकडाही पार करू शकणार नाही'
  2. Arvind Kejriwal : केजरीवाल मुंबईत घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्या 'या' अध्यादेशाविरोधात समर्थन मागणार
  3. Rs 2000 Exchange : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र नाही? काळजी करु नका, ही बातमी वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.