ETV Bharat / state

सायबर गुन्ह्यांना बसणार चाप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अँटी फिशिंग संकेतस्थळाचे उद्घाटन - FADNAVIS

फिशिंग करणाऱ्या विविध साधनांची माहिती नागरिकांना व्हावी, त्यापासून कशा प्रकारे सावध व्हावे, यासंबंधी जनजागृती व्हावी तसेच अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास त्याची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र सायबरच्यावतीने हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अँटी फिशिंग संकेतस्थळाचे उद्घाटन
author img

By

Published : Mar 9, 2019, 1:05 PM IST

मुंबई - राज्यात वाढते सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारकडून नवे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. www.reportphishing.in या संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहात झाले. या संकेतस्थळावरून ऑनलाईन फसवणूक आणि फिशिंगची माहिती सायबर पोलिसांना देता येणार आहे.

सध्या देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आर्थिक व्यवहार वाढले आहेत. सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा उच्च शिक्षित अधिकारी किंवा व्यापारी वर्ग सर्वच आर्थिक फसवणुकीचे शिकार आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे एसएमएस, मोबाईल ओटीपी, बनावट संकेतस्थळ, फोनवरून माहिती घेऊन ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहेत. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरचे अँटी फिशिंग युनिट कार्यरत आहे.

फिशिंग करणाऱ्या विविध साधनांची माहिती नागरिकांना व्हावी, त्यापासून कशा प्रकारे सावध व्हावे, यासंबंधी जनजागृती व्हावी तसेच अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास त्याची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र सायबरच्यावतीने हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबरने नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या तांत्रिक सहकार्याने हे संकेतस्थळ निर्माण केले आहे.

वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्व जिल्ह्यात सायबर लॅब सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. त्याचप्रमाणे आता आर्थिक क्षेत्रातील फिशिंगविरुद्ध माहिती देणारे आणि त्याला आळा घालण्यासाठी अँटी फिशिंग संकेतस्थळ सुरू करणारेही महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. याचबरोबर महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प, अॅटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेटिफिकेशन सिस्टीम, अँटी पायरसी प्रकल्प इत्यादी प्रकल्प महाराष्ट्र सायबरच्यावतीने राबविण्यात येत आहेत.

सायबर गुन्हे व फिशिंग संबंधीची माहिती www.reportphishing.in या संकेतस्थळावर नागरिकांना देता येणार आहे. आर्थिक फसवणुकीची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी संपूर्ण यंत्रणा असणारे हे पहिलेच संकेतस्थळ असणार आहे. तसेच फिशिंगच्या गुन्ह्यांची आकडेवारी या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून अशा फसवणुकीविषयी माहिती देण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन, ट्विटर व ई मेल आयडीही नागरिकांच्या सेवेला असणार आहे.

Intro:मोबाईल,ईमेलद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला बसणार आळाBody:मोबाईल,ईमेलद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला बदसणार आळा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबरच्या अँटी फिशिंग संकेतस्थळाचे उदघाटन

मुंबई, ता. 8 :
राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीपासून ते उच्च शिक्षित अधिकारी, व्यापारी वर्ग आदींना येणारे फसवे ई मेल, एसएमएस, मोबाईल ओटीपी आदीद्वारे होणाऱ्या आर्थिक क्षेत्रातील फसवणुकीला आळा बसणार आहे. त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र सायबरच्या www.reportphishing.in या संकेतस्थळाचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहात झाले. या संकेतस्थळावरून ऑनलाईन फसवणूक, फिशिंगची माहिती या संकेतस्थळाद्वारे सायबर पोलीसांना देता येणार आहे.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आर्थिक व्यवहार वाढले आहेत. त्याच प्रमाणे एसएमएस, मोबाईल ओटीपी, बनावट संकेतस्थळ, फोनवरून माहिती घेऊन ग्राहकांची विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, अशिक्षित नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहेत. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरचे अँटी फिशिंग युनिट कार्यरत आहे. फिशिंग करणाऱ्या विविध साधनांची माहिती नागरिकांना व्हावी, त्यापासून कशा प्रकारे सावध व्हावे, यासंबंधी जनजागृती व्हावी तसेच अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास त्याची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र सायबरच्यावतीने हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबरने नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या तांत्रिक सहकार्याने हे संकेतस्थळ निर्माण केले आहे.
वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरची तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात सायबर लॅब सुरू करण्याचे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्रातील फिशिंगविरुद्ध माहिती देणारे व त्याला आळा घालण्यासाठी अँटी फिशिंग संकेतस्थळ सुरू करणारेही महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. याचबरोबर महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प, ॲटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेटिफिकेशन सिस्टीम, अँटी पायरसी प्रकल्प इत्यादी प्रकल्प महाराष्ट्र सायबरच्यावतीने राबविण्यात येत आहेत. सायबर गुन्हे व फिशिंग संबंधीची माहिती www.reportphishing.in या संकेतस्थळावर नागरिकांना देता येणार आहे. आर्थिक फसवणुकीची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी संपूर्ण यंत्रणा असणारे हे पहिलेच संकेतस्थळ असणार आहे. तसेच फिशिंगच्या गुन्ह्यांची आकडेवारी या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून अशा फसवणुकीविषयी माहिती देण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन, ट्विटर व ई मेल आयडीही नागरिकांच्या सेवेला असणार आहे.
Conclusion:मोबाईल,ईमेलद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला बसणार आळा

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.