मुंबई - म्हाडाची १०० वर्ष जुनी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासक नियुक्त केला होता, तसेच म्हाडाच्या अती धोकादायक इमारतीत तिचा समावेश नव्हता. विकासकाने काम वेळेत केले की नाही, याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास प्राथमिकता देण्यात येणार आहे. इमारत कोसळली तो भाग अत्यंत दाटीवाटीचा आहे. तिथे गर्दी न करता बचावकार्य चालले पाहिजे. जखमींना योग्य मदत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. इमारत कोसळली त्या ठिकाणी १५ कुटुंब वास्तव्यास होते. त्यातील किती जण घरी होते आणि किती बाहेर याची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सध्या सर्व लक्ष मदतकार्यावर केंद्रीत केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.